कायम ऐषारामात राहणारा, जीवनमूल्ये, परिश्रम, कृतज्ञता यांच्याशी काही देणं-घेणं नसणारा गर्भश्रीमंत माणसाचा एक मुलगा, पदवी मिळताच मला माझ्या आवडत्या मॉडेलची कार घेऊन द्या, असा त्याचा वडिलांजवळ हट्ट होता; परंतु वडिलांनी जीवनमूल्ये समजतील अशा पुस्तकांचा मोठा संग्रह मुलाच्या हातात दिलाी. वडिलांनी कार न देता पुस्तके दिल्याने रागाने ती पुस्तके तेथेच ठेवून तो घर सोडून निघून गेला. तो त्यांच्या व्यवसायांत, संसारात यशस्वी होता. काही वर्षांनी वडिलांना भेटावे असे वाटत असतानाच वडील गेल्याचा निरोप मिळाला. गावी येताच आपले घर, तिथल्या वस्तू, बालपणीच्या आठवणीने मन भरून आले. घर आवरताना टेबलावर वडिलांनी दिलेला पुस्तकांचा संच पाहताच, आवरण काढून ती पुस्तके जवळ घेतली. पुस्तकातून पडलेल्या पाकिटातील पत्रांत लिहिले होते, ‘तुझ्या आवडीच्या कारची चावी तुझ्याकरिता ठेवली आहे, त्याचबरोबर दिलेल्या उत्तम ग्रंथातून तू प्रथम विचारधन घे, मग भौतिक सुखाचा आनंद घे.’ पत्रावर पदवी मिळालेल्या दिवसाची तारीख होती. वंदना जोशी लिखित ही गोष्ट.
हाती पदवी येते त्यावेळी मुलांना जगाचा अनुभव, व्यवहारज्ञान नसते. शिक्षणाचाच एक महत्त्वाचा भाग अवांतर वाचन! अनौपचारिक शिक्षण विद्यापीठात मिळत नाही. युवा पिढी तंत्रज्ञानात तरबेज आहे तरीही अपवाद सोडता आजूबाजूच्या परिस्थितीचा अंदाज घेताना, निर्णय घेताना, मते मांडताना, बोलायला लागल्यावर त्यांची विचारकक्षा तोकडी जाणवते कारण वाचन नाही. नेटवरून हवी ती माहिती मिळते; परंतु वाचन स्वतंत्र विचार करायला प्रवृत्त करते. गुणात्मक प्रगतीसाठी विचारधन महत्त्वाचे! वाचा आणि समृद्ध व्हा.
१९९५ पासून युनेस्कोतर्फे २३ एप्रिल हा दिवस जागतिक पुस्तक दिन म्हणून साजरा करताना, वाचन-प्रकाशन आणि कॉपी राईटविषयी कायद्याची लोकांना माहिती दिली. त्याचबरोबर वाचन संस्कृती वाढावी आणि तिचा ग्लोबल आविष्कार साकारला जावा हाही उद्देश आहे. जगप्रसिद्ध साहित्यिक विल्यम शेक्सपिअर यांचा जन्म आणि मृत्यू दिन २३ एप्रिलच आहे. मुळात करिअरची योग्य दिशा निवडायची असेल, तर १४ ते २४ या वयोगटांत उत्तम वाचन हवे. शाळा-कॉलेजच्या तसेच बाहेरच्या ग्रंथालयाला भेट द्या. आवडीनुसार पुस्तकाची निवड करताना तुम्हाला तुमच्या आयुष्याचा रस्ता सापडतो. करिअरबरोबर जीवनातही यशस्वी होण्यासाठी, वेगळ्या वाटेने जाणाऱ्या लोकांचा संघर्ष वाचताना आपले व्यक्तिमत्त्व घडते. बराक ओबामांनी म्हटले आहे, झोपायच्या आधी प्रेरणा देणाऱ्या कथा वाचाव्यात. रात्री तोच विचार जागविला जातो. मनात जीवनाविषयी सकारात्मक विचार जागता ठेवण्यासाठी सध्या वाचनाकडे उपचार पद्धत म्हणून पाहिले जाते. वाचन जीवनाला आकार देते. एखादे
पुस्तक किंवा उतारा नव्हे, एखादे वाक्य आपले संपूर्ण जग बदलू शकते. माणसाला रद्दी होण्यापासून वाचविते.
स्वप्न पाहा नि सत्यात आणा सांगणाऱ्या डॉ. कलामांचा १५ ऑक्टोबर हा जन्मदिवस वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा केला जातो. माणसाला दोनच गोष्टी हुशार बनवितात – १ वाचलेले पुस्तक, २ भेटलेली माणसं. मराठी साहित्य संमेलनात एकदा गुलजारसाहेब म्हणाले, भारतातील सर्व भाषा लेखकांचा मेळावा व्हावा. कन्नड लेखक शिवराम कारंथनुसार ‘तुमचं तुमच्या भाषेवर प्रेम असेल, तर तुमच्या लेखनाबरोबर एक तरी ज्ञानग्रंथ तुमच्या भाषेत आणला पाहिजे. अनुवादातून साहित्याची देव-घेव व्हावी. कन्नड साहित्यिक भैरप्पाने बक्षिसाचे ५० लाख रुपये वाचक शिल्लक राहण्यासाठी, कन्नड भाषेच्या संवर्धनासाठी दिले. डॉ. आंबेडकरांचे प्रसिद्ध कोट, “जर तुमच्याकडे दोन रुपये असतील तर एक रुपयाची भाकरी जगायला मदत करील आणि एक रुपयाचे पुस्तक कसे जगावे हे शिकवेल. ‘‘आजकाल वृत्तपत्रांच्या पुरवण्या सर्वस्पर्शी असतात. वाचन हा स्वतःला समृद्ध करणारा छंद आहे, वाचन ही एक सवय आहे कारण पुस्तक आणि चांगली माणसं लगेच कळत नाहीत, त्यांना वाचावं लागतं.
पु. लं.चे हरितात्या पात्र. हरितात्यांनी आम्हाला कधी खाऊ आणला नाही, पण आमच्या मनगटात इतिहास भरला. तुम्हीही मुलांचे हरितात्या बना. आजचे पालक मुलाच्या शिक्षणासाठी जागरूक असतात, पण वाचनाची गोडी लागावी म्हणून किती पालक प्रयत्नशील असतात. किती पालक मुलांना ग्रंथालयांत, पुस्तक प्रदर्शनाला घेऊन जातात? एका पालकाने रोज एक गोष्ट सांगताना कालांतराने उत्कंठाचा भाग आल्यावर पुस्तक बंद करीत, मुलगा हातातले पुस्तक घेऊन वाचू लागला. ठाण्यात राहणारा अमृत देशमुख सांगतो, लहानपणी मी वाचनवेडा नव्हतो. १० वी झाल्यानंतर, लाॅकडाऊनमध्ये मोठ्या भावाने दिलेले ‘रिच डॅड, पुअर डॅड’ हे पुस्तक वाचल्यावर मला पालकांचा, शिक्षकांचा खरे तर राग आला. आज दिवसाला एक पुस्तक वाचतो. एका घरांत मुलाला अभ्यासाची पुस्तके आणायला पैसे दिले की, नेहमीच अवांतर पुस्तके घरी येत. वडिलांना खूप कौतुक.
सानेगुरुजी कथामाला हा उपक्रम सुरू व्हावा. वाचन संस्कृती तशी अदृश्य गोष्ट असली तरी तिचे परिणाम दृश्य स्वरूपात असतात. एलॉन मस्क यांना एका पत्रकाराने विचारले, “तुम्ही रॉकेट बनविणे कुठे शिकलात? ते उत्तरले, मी बरीच पुस्तके वाचली.” तुमचे वाचन असेल तर तुम्ही अगदी अनभिज्ञ असणाऱ्या क्षेत्रावरही हुकमत गाजवू शकता. लेखक गिल्स ग्रेलेट म्हणतात, ‘वाचन ही अंदाज लावण्याची एक सतत प्रक्रिया आहे. एखाद्यात त्यांना काय सापडेल, यापेक्षा तो पुढे काय आणतो हे अधिक महत्त्वाचं आहे. व. पु. यांचे वाचलेले थोडक्यात, ‘डोळे अधू झाल्याने डॉ. म्हाताऱ्याला डोळ्यांचे ऑपरेशन करायला सांगतात. मला ऑपरेशनची आवश्यकता वाटत नाही. माझ्या घरातच मुले, सुना, नातवंडांच्या रूपांत २० डोळे आहेत. माझी नजर गेली तरी चालेल. अकस्मात त्या रात्री गॅस सिलिंडरचा स्फोट होऊन वाड्याला आग लागताच सारे धावत बाहेर आले. आंधळा म्हातारा घरात राहिला याची जाणीव उशिरा सर्वांना झाली, पण कुणीही आत जाण्याची हिम्मत दाखवली नाही. वाडा परिचयाचा असल्याने म्हातारा घराबाहेर आला. त्यावेळी त्याला समजले, “स्वतःची वाट शोधायला स्वतःचेच डोळे लागतात.”
समर्थ रामदास म्हणतात, प्रसंगी अखंडित वाचित जावे. वाचा आणि समृद्ध व्हा.
mbk1801@gmail.com
मुंबई : मराठी सिनेसृष्टीतून (Marathi) दु:खद बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध अभिनेते, दिग्दर्शक, निर्माते प्रकाश…
मुंबई : पहलगाम हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या महाराष्ट्रातील मृतांच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ५० लाख…
मुंबई : प्रेक्षकांना नेहमीच मनोरंजनासाठी चटपटीत मसालेदार कंटेन्ट हवा असतो. या स्पर्धेत मराठी चित्रपटांनी सगळ्याच…
श्रीनगर : जम्मू काश्मीरमधील पहलगाम हल्ल्यानंतर भारत सरकार हाय अलर्ट मोडवर आहे. सुरक्षा दलांनी काश्मीरमध्ये…
पहलगाम : जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे अतिरेक्यांनी २६ जणांची हत्या केली. नाव आणि धर्म विचारुन…
महिलांना किंवा मुलींना ब्लाऊजचे नवीन नवीन पॅटर्न शिवण्याची खूप आवड असते. कोणत्याही समारंभात साडी नवीन…