साऱ्यांनी भक्तिभावे शंकरजींचे दर्शन घेतले. बालमंडळी छोट्या-छोट्या टेकड्यांवर खूप भटकली. एव्हाना दुपार झालीच होती. वेदपुरात वेगवेगळी मंदिरे बघताना फिरून व शिवमंदिराची टेकडी चढून मुलं थकली होती.
शिवनगर गावापासून जवळपास दहा-बारा किलोमीटर अंतरावर एक मोठा डोंगर होता. त्या डोंगरात एका उंच टेकडीवर एक पुरातनकालीन शिवमंदिर होते. टेकडीच्या पायथ्याशी शिवाई नदीच्या काठावरच एक जुने वेदपूर नावाचे तीर्थक्षेत्र होते. तेथेसुद्धा नदीच्या काठाने काही जुनीपुराणी मंदिरे होती.
एखाद्या सुट्टीच्या दिवशी त्या ठिकाणी सहल काढायचा त्या गावातील चिराग व त्याचे मित्रमंडळ ह्या विद्यार्थीसेनेचा बेत ठरला. श्रावण महिना सुरू झालेला होता. त्यामुळे दर श्रावण सोमवारला शिवमंदिरावर छोटीसी जत्राही भरायची व मुलांना सकाळी शाळा व दुपारी सुट्टी असायची. योगायोगाने येणाऱ्या सोमवारला १५ ऑगस्ट हा स्वातंत्र्य दिन आल्याने व त्यादिवशी शाळेतील कार्यक्रम सकाळी लवकरच आटोपल्यानंतर दिवसभर सुट्टी मिळणार असल्याने सर्वानुमते येणारा सोमवार हाच सहलीचा दिवस ठरविण्यात आला.
१५ ऑगस्टच्या सोमवारला सकाळी सारी मुले झोपेतून लवकर उठली. स्वच्छ गणवेष घालून शाळेत गेली. शाळेत सर्वप्रथम प्रभातफेरी निघाली. प्रभातफेरीनंतर शाळेत विविध राष्ट्रीय कार्यक्रमांमध्ये ज्याने त्याने आपापल्या क्षमतेनुसार भाग घेतला. मुलांना तर आज शाळेतील कार्यक्रम केव्हा संपतात असे झाले होते. शेवटी शाळेतील समारंभ संपला. साऱ्यांनी मिळालेल्या गोड प्रसादाचा आस्वाद घेतला आणि बालमंडळी लगबगीने घरी आली. तोपर्यंत प्रत्येकाच्या आयांनी त्यांचे जेवणाचे डबे तयार करून ठेवले होते.
प्रत्येकाने आपापल्या घरी जाताच घाईघाईनेच आईने दिलेला नाश्ता केला. बॅग्ज व डबे घेतले नि आधी ठरल्याप्रमाणे बसस्टँडवर जमा झाले. थोड्याच वेळात वेदपूरला जाणारी बस आली. बस माणसांच्या गर्दीने खचाखच भरलेली होती. कशीतरी चिरागसेना बसमध्ये घुसली व बसच्या गर्दीत दाटीवाटीने उभी राहिली. बसमध्ये सगळे प्रवासी भोलेनाथ महादेवाचे वारकरी भक्त असल्याने हर हर महादेवच्या गर्जनेने बस सुरू झाली.
पंधरा-वीस मिनिटांतच त्यांची बस वेदपूरला पोहोचली. सारी मंडळी पटापट बसमधून खाली उतरली, जणू काही उड्या मारीतच रस्त्याने चालू लागली. चिरागसेनेने प्रथम वेदपुरातील मंदिरे बघून घेतली. नंतर रमतगमत, निसर्गसौंदर्य न्याहाळत, कवितांच्या भेंड्या खेळत ते शिवमंदिराजवळ पोहोचले. त्यामुळे टेकडीची अवघड चढण काही त्यांना जाणवली नाही. साऱ्यांनी भक्तिभावे शंकरजींचे दर्शन घेतले. बालमंडळी छोट्या-छोट्या टेकड्यांवर खूप भटकली. एव्हाना दुपार झालीच होती. वेदपुरात वेगवेगळी मंदिरे बघताना फिरून व शिवमंदिराची टेकडी चढून मुलं थकली होती.
साऱ्यांना सपाटून भुका लागल्या होत्या. ते मंदिराच्या प्रशस्त आवारात एका झाडाखाली सावलीत बसले. चिरागने मंदिराच्या आवारात शोभेसाठी लावलेल्या एका केळीच्या झाडाचे पान जवळील चाकूने तोडले. साऱ्यांनी आपापले डबे बॅग्जमधून बाहेर काढले. त्या पानावर गोपाळकाला करीत आपले भजन आटोपले. तेथेच थोडा आराम करीत बसले. अर्ध्या तासानंतर ते शिवमंदिराची टेकडी उतरू लागले.
गोष्टी करीत टेकडी उतरता उतरता अचानक मोनूचा पाय घसरून तो खाली पडला व टेकडीच्या उतारावरून दरीकडे घसरत जाऊ लागला. ते बघताच क्षणातच चिराग त्वरित एका क्षणात जमिनीवर पालथा पडला. त्याने आपल्या जीवाची पर्वा न करता ताबडतोब आपल्या दोन्ही पावलांनी तेथीलच एका झुडपाच्या खोडाला कैची मिठी मारून घट्ट पकडले नि आपले हात लांबवून चटकन मोनूला धरले. त्याच्या हातापायाला, पोटाला खरचटले पण त्याने त्याची पर्वा केली नाही.
काय घडले हे बाकीच्यांच्या लक्षात येताबरोबर त्या साऱ्यांनी मिळून ह्या दोघांना हळूहळू व्यवस्थितपणे काळजीपूर्वक वर घेतले. सगळ्यांनी दोघांना कुठे कुठे खरचटले ते बघून आपल्याजवळच्या स्वच्छ रुमालाने ते पुसून साफ केले. मोनू खूप घाबरला होता. त्यांनी मोनूच्या मनातील भीती बाहेर काढली. थोडावेळ त्यांनी तेथेच एका झाडाखाली आराम केला. एवढ्यात तेथे इतरही भाविक आलेत. साऱ्यांनी चिरागच्या हिमतीला दाद दिली. त्याचे कौतुक केले. थोड्याच वेळात ते सारे परतीच्या बसने आपल्या
गावाकडे परतले.
गीतांजली वाणी ज्ञानदायी स्रोत असते पुस्तक आवड जयास उजळ मस्तक नवी जीवनाची प्रगती आणि विकास…
फॅमिली काऊन्सलिंग : मीनाक्षी जगदाळे आजकाल आपण दररोज बघतोय की, अगदी लहान अथवा तरुण मुलं…
महिला पोलीस अधिकारी अश्विनी बिद्रे-गोरे यांच्या हत्येप्रकरणी खाकी वर्दीतला एकेकाळचा सहकारी पोलीस अधिकारी अभय कुरुंदकरला…
मुंबई: इंडियन प्रीमियर लीग २०२५च्या ४०व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने लखनऊ सुपर जायंट्सवर ८ विकेट्सनी विजय…
मुंबई : महाराष्ट्रात पहिली ते पाचवीपर्यंत इंग्रजीबरोबर हिंदी भाषाही सक्तीची करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयावर टीकेची…
मुंबई: जम्मू-काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाम येथे आज, मंगळवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सुमारे २७ जणांचा मृत्यू…