Friday, May 9, 2025

महाराष्ट्रताज्या घडामोडी

पुण्यात अवकाळी पावसाची हजेरी

पुण्यात अवकाळी पावसाची हजेरी

पुणे: राज्यात वाढलेले तापमान आणि अवकाळी पावसाचा लपंडाव सुरु आहे. यातच आता पुण्यात अवकाळी पावसाला सुरुवात झाली आहे. पुण्यातील कोथरुड, सिंहगड मार्गावर मुसळधार पाऊस सुरु आहे. हवामान विभागाने दोन दिवसांपूर्वीच महाराष्ट्रातील विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात जोरदार पावसाची शक्यता वर्तवली होती.


पुण्यात या जोरदार पावसामुळे ठिकठिकाणी पाणी साचले आहे. तसेच रस्त्यांवरील गाड्यांची ये-जा, नागरिकांची गर्दी बंद झाल्याचं दिसून येत आहे. हा पाऊस पुढील दोन ते तीन राहणार असल्याचा हवामान विभागाने अंदाज वर्तवला आहे.


मागील काही दिवसांपासून उन्हाने लाहीलाही होत असतानाच अचानक जोराचा पाऊस आल्याने पुणेकरांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. पुणेकर या पावसात भिजण्याचा आनंद लुटत आहेत.

Comments
Add Comment