मानलं बुवा! 'या बाबतीत' भारताने जगाला मागे टाकले!

चीनचा विक्रमही मोडला!


नवी दिल्ली : संयुक्त राष्ट्रांच्या संयुक्त राष्ट्र लोकसंख्या निधी (युएनएफपीए) ने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार भारताची लोकसंख्या चीनपेक्षा २.९ दशलक्षांनी जास्त झाली आहे. यामुळे भारत जगातील (world population) सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश बनला आहे.


युएनएफपीएने 'द स्टेट ऑफ वर्ल्ड पॉप्युलेशन रिपोर्ट, २०२३' रिपोर्ट प्रकाशित केला आहे. याचे शीर्षक '८ बिलियन लाइव्स, इनफिनिट पॉसिबिलिटीज: द केस फॉर राइट्स अँड चॉइस' असे आहे. हा रिपोर्ट युएनने आजच जाहीर केला आहे. अहवालातील ताजी आकडेवारी 'डेमोग्राफिक इंडिकेटर्स' या श्रेणीमध्ये देण्यात आली आहे.


ही संस्था १९५० पासून जगातील लोकसंख्येची माहिती गोळा करत आहे. यामध्ये एवढ्या वर्षांत पहिल्यांदाच चीनला भारताने मागे टाकले आहे. भारताने चीनला कधी मागे टाकले हे सांगता येत नसल्याचे, युएनएफपीएच्या माध्यम सल्लागार एन्ना जेफरीज यांनी म्हटले आहे. भारताची लोकसंख्या आता १ अब्ज ४२ कोटी ८६ लाख आहे, तर चीनची लोकसंख्या आता १ अब्ज ४२ कोटी ५७ लाख आहे. अशा प्रकारे दोन्ही देशांच्या लोकसंख्येमध्ये २९ लाखांचा फरक आहे.


दोन्ही देशांची तुलना करणे कठीण आहे. कारण दोन्ही देशांच्या माहिती गोळा करण्यात थोडेसे अंतर आहे. चीनची लोकसंख्या गेल्या वर्षी उच्चांकावर होती, परंतू ती यंदा कमी होऊ लागली आहे. दुसरीकडे भारताची लोकसंख्या वाढत चालली आहे. असे असले तरी १९८० पेक्षा वाढीचा वेग कमी आहे. म्हणजेच लोकसंख्या वाढीचा दर पूर्वीपेक्षा कमी आहे. हाच काय तो दिलासा म्हणावा लागणार आहे.

Comments
Add Comment

'ऑपरेशन सिंदूर'ने अझर मसूदच्या कुटुंबालाच संपवले; तुकडे तुकडे केले!

नवी दिल्ली: भारताच्या धडक कारवाईने दहशतवाद्यांमध्ये मोठी दहशत निर्माण झाली आहे. आपल्या देशाच्या सुरक्षेला

अमेरिका-व्हेनेझुएला यांच्यातील तणाव वाढला, अमेरिकेचा ड्रग्ज जहाजावर मोठा हल्ला

वॉशिंग्टन: अमेरिकेने व्हेनेझुएलाहून अमेरिकेकडे येत असलेल्या एका संशयित ड्रग्ज जहाजावर पुन्हा एकदा लष्करी

नेपाळमध्ये सुशीला सरकारचा मोठा निर्णय, आंदोलनादरम्यान प्राण गमावलेल्या Gen-Z ला मिळणार शहीदांचा दर्जा

काठमांडू: नेपाळमध्ये सुशीला कार्की सरकार स्थापन झाल्यानंतर देश हळूहळू आता स्थिरस्थावर होत आहे. सोमवारी सुशीला

नेपाळ, फ्रान्सनंतर आता इंग्लंडमध्ये निदर्शन रॅली, लाखो लोकं रस्त्यावर

लंडन: नेपाळ आणि फ्रान्सनंतर आता आंदोलनाचे वारे ब्रिटनच्या रस्त्यावर देखील दिसून आले आहे. सर्वात महत्वाचे

अमेरिका रशियावर कठोर निर्बंध लादणार

नाटोला चीनवर ५० ते १०० टक्के टॅरिफ लादण्याची मागणी वॉशिंग्टन डीसी (वृत्तसंस्था) : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष

सुशीला कार्की नेपाळच्या नव्या हंगामी पंतप्रधान

नेपाळची संसद बरखास्त, हंगामी सरकारचे नेतृत्व करणार नवी दिल्ली : नेपाळमध्ये मागील काही दिवसांपासून मोठ्या