उष्माघाताच्या बळींनंतरही सरकारला शहाणपण येईना, मंत्रालयाबाहेर गर्दी

मुंबई: काही दिवसांपूर्वी झालेल्या महाराष्ट्र भूषण पुरस्कार कार्यक्रमात उष्माघाताने बळी गेल्यानंतरही सरकारने यातून काही बोध घेतल्याचे चित्र दिसत नाही. आज कडाक्याच्या उन्हाळ्यात भर दुपारी राज्याच्या कानाकोपऱ्यातून मंत्रालयात कामानिमित्त आलेले नागरिक मंत्रालयाबाहेर पास घेण्यासाठी तासनतास ताटकळत उभे असल्याचे चित्र होते. कारण काय तर तांत्रिक अडचणींमुळे पास नाही.


मंत्रालयात विविध कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांना आत प्रवेशासाठी पास काढावे लागतात. आज या पाससाठी मंत्रालयाबाहेर भर उन्हात लांबच लांब रांगा लागल्या होत्या. पास मिळत नसल्याने नागरिक प्रशासनाच्या कारभाराविरोधात तीव्र संताप व्यक्त करत होते. पास का मिळत नाहीत याचे कारण जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता असे समजले की येथील इंटरनेट बंद पडले आहे. त्यामुळे पास मिळत नव्हते. राज्यातील पुणे, नाशिक, नगर, कोल्हापूर, सोलापूर यांसह अन्य शहरांतून हे नागरिक कामानिमित्त येथे आले होते.

Comments
Add Comment

मुंबईत गुरु माँ म्हणून वावरणाऱ्या बांगलादेशी तृतीयपंथीयाचा पर्दाफाश

मुंबई : मुंबईत गुरु माँ म्हणून वावरणाऱ्या बांगलादेशी तृतीयपंथीयाचा पर्दाफाश झाला आहे. ही व्यक्ती मागील ३०

मुंबई महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना यंदा ३१ हजार सानुग्रह अनुदान

मुंबई (खास प्रतिनिधी) : मुंबई महानगरपालिका अधिकारी व कर्मचारी यांना दीपावली - २०२५ प्रीत्यर्थ ३१ हजार रुपये

महापालिकेच्या ३० निवृत्त कर्मचाऱ्यांची दिवाळी यंदाही अंधारमय, आयुक्तांच्या हृदयाला कधी फुटणार पाझर...

मुंबई, खास प्रतिनिधी : मुंबई महापालिकेच्या तब्बल ३० हून अधिक सेवा निवृत्त कर्मचाऱ्यांना आज सेवा निवृत्तीच्या

माजी मुख्य सचिव सुजाता सौनिक संकटात, जुनं प्रकरण भोवणार ?

मुंबई : शिक्षकांच्या पदोन्नतीसंदर्भातील न्यायालयीन आदेशाचे पालन न केल्याने अवमान याचिकेत गंभीर दखल घेत मुंबई

मुंबईच्या रेल्वे प्लॅटफॉर्मवर माणुसकीचं दर्शन! प्रसूती वेदनांनी व्याकूळ महिलेला एका तरुणाने दिला मदतीचा हात

मुंबई: मुंबईच्या लोकल ट्रेनमध्ये किंवा रेल्वे स्थानकांवर प्रसूती होण्याच्या अनेक घटना घडतात. पण राममंदिर

महापालिकेच्या त्या ३० निवृत्त कर्मचाऱ्यांची दिवाळी यंदाही अंधारमय, आयुक्तांच्या हृदयाला कधी फुटणार पाझर...

मुंबई (खास प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेच्या तब्बल ३० हून अधिक सेवा निवृत्त कर्मचाऱ्यांना आज सेवा निवृत्तीच्या