'सन्मान महाराष्ट्राचा २०२३' पुरस्कार सोहळा २९ एप्रिलला

  496

मुंबई (वार्ताहर) : महाराष्ट्राची ओळख आपल्या कार्यकर्तृत्वाने अधिक ठसठशीत करणाऱ्या काही मान्यवरांचा सन्मान करणारा 'सन्मान महाराष्ट्राचा २०२३' हा पुरस्कार सोहळा महाराष्ट्र् दिनाचे औचित्य साधून संपन्न होणार आहे. ‘अर्थ’ या संयुक्त राष्ट्रसंघाची मान्यता असलेल्या संस्थेतर्फे दिनांक २९ एप्रिल २०२३ रोजी बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स येथील एमएमआरडीए मैदानात ‘सन्मान महाराष्ट्राचा २०२३’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात वेगवेगळ्या क्षेत्रात अतुलनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांना सन्मानित करण्यात येणार आहे.


पद्मश्री दादा इदाते (सामाजिक), पद्मश्री गिरीश प्रभुणे (शैक्षणिक), पद्मश्री राहीबाई पोपेरे (कृषी), शैलेश गांधी (सामाजिक), अनिल गलगली (सामाजिक), हेमा राचमाले (सामाजिक), प्रवीण दीक्षित (प्रशासकीय), अवंतिका चव्हाण (क्रीडा), मनीष अडविलकर (क्रीडा), महेश कोठारे (सांस्कृतिक आणि मनोरंजन), आकाश ठोसर (सांस्कृतिक आणि मनोरंजन), अविनाश चंद्रचूड व विश्वजीत जोशी (सांस्कृतिक आणि मनोरंजन), महेश झगडे, माजी आयुक्त, अन्न व औषध प्रशासन, (आरोग्य), डॉ. पंकज चतुर्वेदी, उप-संचालक, टाटा मेमोरियल सेंटर, (आरोग्य), योगेश लखानी (उद्योग क्षेत्र), नितीन पोतदार (आर्थिक क्षेत्र), य. दु. जोशी (मराठी पत्रकारिता), राहुल गडपाले (मराठी पत्रकारिता), धर्मेंद्र जोरे ( इंग्रजी पत्रकारिता), पॉला मॅकग्लिन (डिजिटल), मधुरा बाचल (डिजिटल), फोकस इंडिया (डिजिटल), रतन लथ (शैक्षणिक), प्रोफेसर उल्हास बापट (शैक्षणिक), गोल्डस जिम (फिटनेस), दिग्पाल लांजेकर (सांस्कृतिक आणि मनोरंजन) या मान्यवरांना सन्मानित करण्यात येणार आहे.

Comments
Add Comment

हार्बर रेल्वे ठप्प! तांत्रिक बिघाडामुळे नेरूळ ते पनवेल सेवा बंद, संध्याकाळी घरी जाणाऱ्या प्रवाशांचे हाल

तांत्रिक बिघाडामुळे आज रविवारी संध्याकाळच्या सुमारास हार्बर रेल्वे सेवा विस्कळीत नवी मुंबई: मुंबईतील मध्य

दादरचा ऐतिहासिक कबूतरखाना बंद: मुंबईची एक ओळख काळाच्या पडद्याआड

मुंबई: दादर पश्चिमेचा कबुतरखाना आता कायमचा बंद होणार आहे. एकेकाळी दादरकरांसाठी पत्ता सांगताना कबुतरखाना ही एक

सर्व प्रतिज्ञापत्रांसाठी मुद्रांक शुल्क माफ

महसूलमंत्री बावनकुळे यांची घोषणा मुंबई : सर्व प्रकारच्या प्रतिज्ञापत्रासाठी जोडावे लागणारे पाचशे रुपयांचे

पालकमंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत नागरिकांच्या सार्वजनिक, वैयक्तिक समस्यांवर थेट सुनावणी

जनतेच्या तक्रारींचे त्वरित निवारण  सिंधुदुर्गनगरी : शनिवारी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नागरिकांच्या अनेक

आपल्या देशाचे नाव उंचावण्याची भावी अधिकाऱ्यांची जबाबदारी

खासदार नारायण राणे यांचे यूपीएससी गुणवंतांना मार्गदर्शन मुंबई : येत्या काळात भारत हा चौथ्या अर्थव्यवस्थेवरून

शुक्रवारच्या कारवाईनंतर दादर कबुतर खान्यावर खाद्य देणे सुरूच !

खाद्य विकणाऱ्यांसह दाणे टाकणाऱ्यांवर कारवाई करण्याकडे दुर्लक्ष मुंबई (प्रतिनिधी) : मुंबईतील कबुतर खान्यांवर