राधाकृष्ण विखे-पाटील यांचा टोला
नाशिक: आदित्य ठाकरे यांनी केलेल्या विधानाचे अद्यापही पडसाद उमटताना दिसत आहे. शिंदे गटातील नेत्यांसह भाजप नेत्यांनीही आदित्य ठाकरेंवर पलटवार केला आहे. महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनीही आदित्य ठाकरेंचा समाचार घेतला आहे. आदित्य ठाकरेंचा पप्पू होऊ नये, एवढी काळजी त्यांनी घेतली पाहिजे. आदित्य ठाकरेंचा पोरखेळ संपलेला दिसत नाही. सत्ता गेल्यावर त्यांना शहाणपण येईल असे वाटत होते, असा टोला राधाकृष्ण विखे-पाटील यांनी लगावला आहे.
ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविषयी केलेला गौप्यस्फोट, महाविकास आघाडीची नागपूर येथे होत असलेली वज्रमूठ सभा आणि राहुल गांधी व उद्धव ठाकरे यांच्या भेटीच्या शक्यतेवरून राज्यातील राजकीय वातावरण तापल्याचे पाहायला मिळत आहे.
राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले, एकनाथ शिंदे हे रडणारे नाहीत, तर लढणारे नेते आहेत. त्याची प्रचिती महाराष्ट्राने अनुभवली आहे. सत्ता गेल्यानंतर आदित्य ठाकरे एवढे वैफल्यग्रस्त झालेत की, त्यांना रडू आवरत नाही.