सोशल मिडियावर चिमुकलीचे मोदींना आवाहन, पाहुन अश्रू होतील अनावर

कठुआ: सध्या सोशल मिडियावर एक क्युट व्हिडिओ भाव खातोय. जम्मू-काश्मीरच्या (J&K) कठुआ जिल्ह्यातील लोहाई-मल्हार गावच्या मुलीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आवाहन केलंय. तिचं हे गोड आवाहन पाहून तुम्हीही तिच्या प्रेमात पडाल. पण तिचं आवाहन जरी गोड असलं तरी ते तितकचं गंभीर आहे.


फेसबुकवर व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये दिसणारी विद्यार्थिनी पाच मिनिटांच्या या व्हिडिओमध्ये संपूर्ण शाळेची दयनीय अवस्था मांडते. संपूर्ण शाळेभोवती फेरफटका मारून ती त्या शाळेची खराब अवस्था, तुटलेले फरशी, चिखल, कार्यालय आणि शाळेचं स्वच्छतागृह इत्यादी गोष्टी क्रमाने दाखवते. हे सर्व दाखवून झाल्यावर ती म्हणते, “मोदीजी, तुम्ही संपूर्ण देशाचे ऐकता. माझे पण ऐका आणि आमची ही शाळा चांगली बनवा, खूप सुंदर शाळा बनवा म्हणजे आम्हाला असे खाली बसावे लागणार नाही. जेणेकरून आमचा ड्रेस खराब होणार नाही आणि आम्हाला चांगला अभ्यास करता येईल.” मुलीचा हा व्हिडीओ सध्या जोरदार व्हायरल होत आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.


Comments
Add Comment

उड्डाणानंतर दिल्ली - मुंबई विमानात बिघाड, इंजिन हवेतच पडलं बंद

नवी दिल्ली : दिल्लीहून मुंबईकडे निघालेल्या एअर इंडियाच्या विमानात उड्डाणानंतर अवघ्या ४० मिनिटांत तांत्रिक

"दिपू दासच्या मृत्यूला जबाबदार कोण?" बंगालमधील हिंदूंच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

कोलकाता : भारतीय राजकारणात पश्चिम बंगाल हे नेहमीच संघर्षाचे केंद्र राहिले आहे. डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी

माजी अग्निवीरांना सीमा सुरक्षा दलातील भरतीत ५० टक्के कोटा

मोदी सरकारचा मोठा निर्णय नवी दिल्ली : माजी अग्निवीरांना आता सीमा सुरक्षा दलात (बीएसएफ) ५० टक्के कोटा निश्चित

विवाह हे केवळ शारीरिक संतुष्टीचे साधन नव्हे...

‘लिव्ह-इन रिलेशनशिप’वर सरसंघचालक मोहन भागवत यांचे स्पष्ट मत कोलकाता : "कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक

रेल्वे प्रवासभाड्यात वाढ

२६ डिसेंबरपासून अंमलबजावणी नवी दिल्ली : भारतीय रेल्वेने रेल्वे प्रवास भाड्यात वाढ करण्याचा निर्णय घेतला असून

कंगना राणौत हिंदी सल्लागार समितीची सदस्य बनली,जाणून घेऊया किती वर्षांचा असेल कार्यकाळ

नवी दिल्ली : प्रसिद्ध अभिनेत्री कंगना राणौत ही आता आपल्याला चित्रपटासोबत मंत्रालयामध्ये देखील पहायला मिळणार