Monday, October 20, 2025
Happy Diwali

पुरुषाची बायको जाते तेव्हा तुम्ही काही लावता का?

खासदार सुप्रिया सुळे यांचा मंत्री मंगलप्रभात लोढा यांना सवाल

मुंबई : राज्यातील विधवा महिलांना सन्मान मिळवून देण्यासाठी यापुढे त्यांच्या नावापुढे ‘गंगा भागिरथी’ (गं. भा.) असा उल्लेख कराच असे सरकारने सांगणे म्हणजे एखाद्या पुरुषाची बायको जेव्हा जाते तेव्हा तुम्ही काही लावता का? तुम्ही समतेची भाषा करता हा महिलांवर अन्याय नाही का? असा संतप्त सवाल राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केला आहे.

राज्यातील विधवा महिलांना सन्मान मिळवून देण्यासाठी यापुढे त्यांच्या नावापुढे ‘गंगा भागिरथी’ (गं. भा.) असा उल्लेख करावा, असा प्रस्ताव तयार करण्याची सूचना महिला व बाल विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी विभागाच्या सचिवांना केली आहे. मात्र, तसा उल्लेख केल्यास समाजात विधवा महिलांची ओळख जाहीर होईल, असा आक्षेप महिला संघटनांनी घेतला आहे.

हे पण वाचा : ‘विधवा’ ऐवजी ‘गंगा भागिरथी’ या शब्दाला महिला संघटनांचा आक्षेप

यावर, मंगलप्रभात लोढा वरिष्ठ मंत्री आहेत. त्यांच्याबद्दल मला आदर आहे. मला आश्चर्य वाटले, त्यांच्याशी मी फोनवरुन संपर्क करणार आहे. यात खरंच वेगळेपण करण्याची ऑर्डर काढून करण्याची गरज आहे का? श्रीमती हा शब्द वापरला जातो. तुम्ही त्यांना प्रेमाने काहीही म्हणू शकता परंतु सरकारने ऑर्डर काढून नावापुढे काहीतरी लावणे म्हणजे त्यांना वेगळे करणे आहे. विधवा हा शब्द कटू वाटतो त्यावर चर्चा होऊ शकते. पण असे परस्पर निर्णय घेऊन जनतेला त्याचा काय फायदा होणार आहे, असेही सुळे म्हणाल्या.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >