Friday, March 28, 2025
Homeक्रीडाIPL 2025दिल्लीकडून नकोसा विक्रम आणखी भक्कम

दिल्लीकडून नकोसा विक्रम आणखी भक्कम

आयपीएलच्या इतिहासात २५व्यांदा सर्वबाद

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आयपीएलच्या यंदाच्या हंगामात सलग चार सामने गमावणाऱ्या दिल्ली कॅपिटल्सने एक नकोसा विक्रम आणखी मजबूत केला आहे. मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यात दिल्लीचा संघ सर्वबाद झाला. आयपीएलच्या इतिहासात दिल्लीचा संघ २५व्यांदा सर्वबाद झाला आहे. त्यामुळे सर्वाधिक वेळा ऑलआऊट होण्याचा विक्रम दिल्लीने मुंबईविरुद्धच्या सामन्यात आणखी भक्कम केला.

दिल्ली कॅपिटल्स हा आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक वेळा सर्वबाद झालेला संघ आहे. दिल्लीचा संघ २५व्यांदा आयपीएल सामन्यात ऑलआऊट झाला. या नकोशा विक्रमात आधीच संघ अव्वल होता आणि आता पुन्हा एकदा ऑलआऊट झाल्यामुळे संघाचा हा लाजिरवाणा विक्रम आणखी भक्कम झाला आहे. दिल्ली कॅपिटल्सनंतर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू म्हणजेच आरसीबी दुसऱ्या क्रमांकावर आहे, जो २३ वेळा ऑलआऊट झाला आहे.

आयपीएलमध्ये आतापर्यंत २१ वेळा ऑलआऊट झालेली राजस्थान रॉयल्स या क्रमवारीत तिसऱ्या स्थानावर आहे. या यादीत चौथे नाव पंजाब किंग्जचे आहे. पंजाबच्या संघाने आयपीएलच्या इतिहासात २० वेळा सर्व विकेट गमावल्या आहेत. कोलकाता नाईट रायडर्स १९ वेळा ऑल आऊट झाला आहे. मुंबई इंडियन्सने १८ वेळा सर्व विकेट गमावल्या आहेत. सनरायझर्स हैदराबादला आतापर्यंत १० वेळा ऑलआऊट झाला आहे. परंतु चेन्नई सुपर किंग्ज हा एकमेव संघ आहे, ज्याने ४ विजेतेपद जिंकले आहेत आणि १४ हंगामात केवळ ९ वेळा ऑलआऊट झाला आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -