पतधोरणात व्याजदर ‘जैसे थे’च…

Share
  • गुंतवणुकीचे साम्राज्य: डॉ. सर्वेश सुहास सोमण

भारतीय शेअर बाजार हा मागील आठवड्यात देखील तेजीत राहिला. या आठवड्यात भारतीय शेअर बाजाराचे लक्ष होते ते रिझर्व्ह बँकेच्या पतधोरणाकडे. रिझर्व्ह बँक ही बँकांना जे कर्ज देते आणि त्या दिलेल्या कर्जाला जे व्याजदर लावते त्याला ‘रेपो दर’ असे म्हणतात. तर बँका रिझर्व्ह बँकेकडे ज्या ठेवी ठेवतात त्या ठेवींवर बँकांना जो परतावा मिळतो त्याला ‘रिव्हर्स रेपो दर’ असे म्हणतात. रिझर्व्ह बँकेने या चालू वर्षातील पहिले पतधोरण गुरुवारी जाहीर केले. पतधोरण निश्चिती समितीने व्याज दर ‘जैसे थे’ ठेवत कर्जदारांना अनपेक्षित पण सुखद धक्का दिला. त्यांनी “रेपो दरात” कोणतीही कपात केली नाही. तो ६.५ टक्के असाच कायम ठेवण्यात आला. गेल्या आर्थिक वर्षात सलग ६ वेळा वाढ केल्यानंतर यावेळी वाढ न करण्याचा निर्णय पतधोरण समितीने घेतला. २०२३-२४ मध्ये विकास दर ६.५ टक्के जाण्याचा अंदाज यावेळी वर्तवला गेला.

पतधोरण जाहीर झाल्यानंतर शेअर बाजाराने या पतधोरणानंतर सकारात्मक प्रतिक्रिया दिली. पतधोरण सकाळी १० वाजता जाहीर होण्यास सुरुवात झाली, त्यानंतर काही काळासाठी शेअर बाजाराच्या निर्देशांकात थोडी घसरण झाली. पतधोरण जाहीर झाल्यानंतर निर्देशांक निफ्टीने १७६३७ या दिवसभरात उच्चांकी पातळीला स्पर्श केला. पतधोरणाच्या निर्णयाबाबत संवेदनशील असणारे क्षेत्र म्हणजे बँक, वाहन उद्योग, वित्तीय संस्था. यामध्ये देखील पतधोरणानंतर वाढ दिसून आली. अलीकडेच्या काळात ‘रेपो दरात’ रिझर्व्ह बँकेकडून जी कपात केली गेली त्या तुलनेत बँकांकडून मात्र कर्जावरील व्याजाच्या दरात तेवढ्या प्रमाणात म्हणावी तशी कपात झालेली नाही. याचा विचार करता जरी यावेळी पतधोरणात कोणताही बदल झाला नसला तरी अजून बँकांकडून कर्ज स्वस्त होऊ शकतात. यासाठी मात्र बँकांनी पावले उचलणे गरजेचे असेल.

पुढील आठवड्याचा विचारकरिता शेअर बाजाराची दिशा ही तेजीची आहे. २० मार्चपासून जानेवारी निर्देशांक ‘निफ्टी’मध्ये ६०० अंकांनी आणि ‘बँकनिफ्टी’मध्ये २४०० अंकांनी वाढ झालेली आहे.
त्यामुळे निर्देशांक तेजीत असले तरी टेक्निकल बाबींच्याकडे पाहता निर्देशांवरील धोकादायक पातळीच्या जवळ आलेले आहेत. त्यामुळे यापुढे निर्देशांक ‘पूल बॅक’ देणे अपेक्षित आहे. पुढील आठवड्यासाठी अल्पमुदतीच्या चार्टनुसार ‘निफ्टी’ १७३१२ आणि ‘बँकनिफ्टी’ ४०५०० ह्या प्रत्येक निर्देशांकाच्या अत्यंत महत्त्वाच्या पातळ्या आहेत. या पातळ्या जर तुटल्या तर निर्देशांकाच्या तेजीला लगाम लागेल. त्यामुळे पुढील आठवड्यासाठी शेअर्स खरेदी किंवा विक्री करीत असताना निर्देशांकाच्या वरील अत्यंत महत्त्वाच्या पातळ्या लक्षात ठेवूनच व्यवहार करणे आवश्यक आहे.

टेक्निकल अॅनालीसीसनुसार करिअर पॉइंट, न्युक्लीयस सॉफ्टवेअर, ग्लेनमार्क फार्मा यासह अनेक शेअर्सची दिशा ही तेजीची आहे. मध्यम मुदतीचा विचारकरिता ‘अपटेक लिमिटेड’ या शेअरने आपल्या सर्व ३८८ ही अत्यंत महत्त्वाची पातळी तोडत टेक्निकल अॅनालिसिसनुसार तेजीची दिशा दाखविलेली आहे. त्यामुळे आज ४११ रुपये किमतीला असणाऱ्या या शेअरमध्ये पुढील घसरणीत मध्यम मुदतीसाठी ३४० रुपये किमतीचा बंद पद्धतीने स्टॉपलॉस ठेवून खरेदी केल्यास चांगला फायदा होऊ शकेल.

कमोडीटी मार्केटचा विचारकरिता सोने आणि चांदी यांची दिशा ही तेजीचीच असून जोपर्यंत सोने ५९००० च्या वर आहे तोपर्यंत सोन्यातील तेजी कायम राहील. त्यामुळे सोन्यामध्ये तेजीचा व्यवहार केल्यास चांगला फायदा होऊ शकेल. त्याचवेळी करन्सी मार्केटमध्ये डॉलरने देखील ८२ ही अत्यंत महत्त्वाची पातळी तोडलेली आहे. त्यामुळे पुढील काळाचा विचार करता डॉलरमध्ये आणखी घसरण होणे अपेक्षित आहे. जोपर्यंत डॉलर ८२.५० च्या वर जाणार नाही तोपर्यंत डॉलर तेजीत येणार नाही. त्यामुळे डॉलरमध्ये योग्य स्टॉपलॉस ठेवून मंदीचा व्यवहार केल्यास चांगला फायदा होऊ शकेल.

या काही आठवड्यात कच्चे तेलात वाढ झालेली आहे. मात्र मध्यम मुदतीच्या चार्टनुसार कच्च्या तेलामध्ये पुढील काळात नफा वसुली अर्थात पूल बॅक अपेक्षित आहे. आता जोपर्यंत कच्चे तेल ६७२० च्या खाली आहे तोपर्यंत कच्च्या तेलात पुन्हा घसरण होऊ शकते. सध्या कच्च्या तेलात होत असलेली हलचाल पाहता कमीत कमी जोखीम घेऊनच त्यामध्ये ट्रेड करावा. ट्रेड करत असताना स्टॉपलॉसचा वापर करणे अत्यंत आवश्यक आहे.

(सूचना : लेखकाची तसेच त्यांच्या जवळच्या नातेवाइकांची लेखात सुचवित असलेल्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये कोणतीही गुंतवणूक नाही किंवा सुचविलेल्या कंपन्यांशी लेखकाचा कुठलाही संबंध नसून कंपनीकडून कोणतेही मानधन किंवा भेटवस्तू घेतलेली नाही)

samrajyainvestments@gmail.com

Recent Posts

Daily horoscope : दैनंदिन राशीभविष्य, शनिवार, २६ एप्रिल २०२५

पंचांग आज मिती चैत्र कृष्ण त्रयोदशी ८.३० पर्यंत नंतर चतुर्दशी शके १९४७. चंद्र नक्षत्र उत्तराभाद्रपदा…

45 seconds ago

नाले व कचरा सफाई ; केवळ कागदावरच नसावी

पावसाळा आता जेमतेम सव्वा महिन्यावर आलेला आहे. पावसाळी हंगामास दरवर्षी कागदोपत्री १ जूनला सुरुवात होत…

6 minutes ago

मराठवाडा तहानलेलाच

मराठवाडा वार्तापत्र: अभयकुमार दांडगे उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत आहे. त्याच तुलनेत मराठवाड्यात तहानलेल्या गावांच्या संख्येतही…

21 minutes ago

बंद घरे मोकळा श्वास घेऊ लागली

रवींद्र तांबे ग्रामीण भागाचा विचार करता अजूनही पुरेशा मूलभूत सोयी नसल्याने नागरिक मुलांना घेऊन शहराकडे…

35 minutes ago

CSK vs SRH, IPL 2025: हर्षल पटेलची भेदक गोलंदाजी, चेन्नईचे हैदराबादला १५५ धावांचे आव्हान

मुंबई: इंडियन प्रीमियर लीग २०२५च्या ४३व्या सामन्यात आज चेन्नई सुपर किंग्स आणि सनरायजर्स हैदराबादशी होत…

59 minutes ago

पहलगाम दुर्घटनेत जखमी व त्यांच्या कुटुंबियांसाठी महापालिका रुग्णालयांकडून आरोग्य सेवा

मुंबई: पहलगाम येथे नुकत्याच झालेल्या दुर्घटनेनंतर जखमी व त्यांच्या कुटुंबियांसाठी मुंबई महानगरपालिकेच्या टोपीवाला नॅशनल मेडिकल…

1 hour ago