Categories: कोलाज

स्वतःला घडवा

Share
  • गुलदस्ता: मृणालिनी कुलकर्णी

निसर्गदत्त किंवा जन्मदत्त काहीही नसले तरी चालेल; परंतु व्हिजन हवे, अप्रोच महत्त्वाचा, कमिटमेंट हवी, अटॅचमेंट हवी. स्वतःतील कमतरता, उणिवा समजल्या की, अर्धी लढाई तुम्ही जिंकता. स्वतःच्या ताकदीपेक्षा आजकाल परिस्थिती महत्त्वाची.

बालपण अथक परिश्रमात व्यतीत करूनही विद्येची अखंड आराधना करत आयुष्य जगले. त्यांना फायटर पायलट व्हायचे होते. निवड न झाल्याने ते भारतीय एरोस्पेस शास्त्रज्ञ झालेले, भारताचे राष्ट्रपती भारतरत्न डॉ. अब्दुल कलाम. क्रिकेट हाच त्यांच्या आयुष्याचा एक भाग असलेला, वयाच्या ११व्या वर्षांपासून घेतलेले परिश्रम, सातत्यपूर्ण सराव करून क्रिकेट विश्वातील सर्वोत्तम फलंदाज, भारतरत्न सचिन तेंडुलकर. साऱ्या भारतीयांचे आदर्श! उच्च स्थानावर पोहोचूनही दोघेही विनम्र! त्यांनी स्वतःला कसे घडविले, हे सर्वश्रुत आहे.

१०/१२वी परीक्षेनंतरचा सुट्टीचा काळ स्वतःला घडविण्यासाठी असतो. अभ्यास चालू असताना गिटार वाजवावी, ट्रेकिंगला जावे, पुस्तक वाचावे, वेगळे काहीतरी करण्यासाठी अनेक विचार मनात तरळत असतात. परीक्षा संपताच बऱ्याच घरात उत्तरच नसते. या वयात मुलांच्या मनांत अनेक वाटा, अनेक प्रश्न घोळत असतात. आपण मोठे झालो याची जाणीवही असते. त्याचा मनावर ताणही असतो. या काळात पालकांचा फक्त पाठिंबा हवा. नक्की कशाकडे लक्ष द्यायचे हे कळले की, घोळ होत नाही. न कळता समाजाच्या मागे धावलात, तर गुलाम म्हणून नोकरी करता. ह्याच दिवसाच्या धडपडीत अनेक लोक मोठे झाले आहेत. मिताली राज, धोनी, मिल्खासिंग हे चित्रपट पाहा.

सेल्फ एस्टीम : स्वत:ला जाणून घेणे, स्वतःचे महत्त्व समजणे. तीन वेळा नापास झाल्यावर आय. ए. एस.च्या मांदियाळीत टॉपर व्हायला तेवढीच जिगर लागते. सामाजिक कार्यकर्त्या डॉ. स्मिता कोल्हे या सकाळी वकिली शिक्षण आणि दुपारी होमिओपॅथी शिक्षण एकाचवेळी घेऊन दोन्ही पदव्या मिळविल्या.

आजचा काळ सेवा उद्योगाचा आहे. हॉटेल, पर्यटन, बँक, विमा, रिअल इस्टेट, उद्योग, क्षेत्र, करमणूक, या साऱ्या क्षेत्रांत वेगाने विस्तार होतोय. त्यासाठी विविध भाषा, इतिहास, भूगोल शिका. येथे करिअरला खूप वाव आहे. मोबाइल क्रांतीच्या युगांत स्वतःला समृद्ध करा. आज बघता बघता जग बदलतंय. नावीन्य तुमची ओळख बनते. स्वतःला घडविताना पदवी, उच्चशिक्षण हे एकतर्फी पुरेसे नाही. तुम्ही कोण आहात आणि पैसे कसे कमवायचे, या दोन गोष्टी शिकविल्या जात नाहीत. स्वतःच्या व्यक्तिमत्त्वातही लक्ष केंद्रित करत कालानुरूप बदलत, भविष्याचा विचार करून तुम्ही निवडलेल्या शाखेत, क्षेत्रात शिकण्याच्या प्रक्रिया चालू ठेवा.

मागील काळांत पंडित भीमसेन जोशी, सुधीर फडके यांनी संगीतासाठी घर सोडले होते. शिवकुमार शर्मा, पंडित जसराज हे मूळचे तबलावादक यांनी संतूरसाठी, गाण्यासाठी तबला सोडला. ऑलिम्पिक किंवा अन्य खेळाडूंना मनोरंजन, खाणे अशा अनेक गोष्टींचा त्याग करावा लागतो. स्वतःत छोटे-छोटे बदल करीत, सवयी बदलत, मेहनतीबरोबर जगण्याची पद्धतही बदलते. रियाझ, सरावात खंड नसतो. त्यांची स्पर्धा प्रथम स्वतःशीच असते. स्वतःला घडविताना, यशस्वी करिअरसाठी स्वतःच्या कामाकडे तटस्थपणे पाहत सातत्याने ते सिंहावलोकन करतात.

एडिसनने विजेच्या दिव्याचा शोध लावला. राईट बंधूंनी विमानाचा शोध लावला. ग्रॅहम बॅलेने टेलिफोन विकसित केला. रमण यांनी प्रकाश विकिरण सांगितले. स्टिव्ह जॉब्स अॅपल संगणकाची निर्मिती या साऱ्या संशोधकांनी स्वकष्टातून स्वतःला घडविले. ग्रॅहम बॅले म्हणतात, ‘मळलेल्या वाटा सोडा आणि घनदाट झाडीमध्ये शिरा’ भूक लागली की, अन्न-पाणी-आसरा शोधला जातो. वयाच्या ५२ वर्षांपर्यंत नुसते पराभव ज्याने पाहिले ते अब्राहम लिंकन सर्वाधिक लोकप्रिय अध्यक्ष ठरले. एकही शब्द न बोलता साऱ्या जगाला खळखळून हसविणारे दि ग्रेट चार्ली चॅप्लिन! पाच, सहा वर्षांच्या खेळण्या-बागडण्याच्या वयात अत्यंत हलाखीच्या परिस्थितीमुळे स्वतःचे दुःख पचवून कॉमेडी करून प्रेक्षकांना हसविले. एक यशस्वी अभिनेता, दिग्दर्शक, संगीतकार चार्लीने स्वतःच स्वतःला घडविले.

रोजच्या जीवनात लहान-मोठी करोडो उदा. आहेत. त्यांनी स्वतःला घडविले. तरुणांनो! सर्वात प्रथम सुरक्षित वातावरणापासून बाहेर पडा. विविध कलादालने, मैदाने, क्लब, जिम, शैक्षणिक-सामाजिक संस्था, विद्यापीठे, एनजीओ, लायन्स क्लब, छोटे-छोटे उत्पादन करणारे लघू उद्योग सगळीकडे जा, लोकात मिसळा. समाजातील परिस्थिती कळते. खेड्यात जा. जेवढे वेगवेगळ्या ठिकाणी फिराल, तेवढ्या जाणिवा विकसित होतील. तुमचे क्षेत्र विस्तारेल. कदाचित तुमचे हरवलेले सेल्फ एस्टीम मिळेल. संवाद साधा. लोकांचे वेगवेगळे दृष्टिकोन समजतात. यातच कोणीतरी पॉझिटिव्ह भेटते, कोणीतरी टोकतेसुद्धा. त्यातून जाग येते.

निसर्गदत्त किंवा जन्मदत्त काहीही नसले तरी चालेल; परंतु व्हिजन हवे, अप्रोच महत्त्वाचा, कमिटमेंट हवी, अटॅचमेंट हवी. स्वतःतील कमतरता, उणिवा समजल्या की अर्धी लढाई तुम्ही जिंकता. स्वतःच्या ताकदीपेक्षा आज-काल परिस्थिती महत्त्वाची.

दोन बेडकांमधील संवाद-विहिरीत एवढे मुबलक पाणी आपल्याला आणखीन दुसरीकडे कुठे मिळणार? त्यावर शहाणा बेडूक शांतपणे म्हणाला, अरे वेड्या! दलदल आटली तर दुसरीकडे लगेच जागा शोधता येईल, विहिरीतील पाणी आटले तर आपण बाहेर येऊ तरी शकू का?

झगमगत्या दुनियेत प्रलोभनाला भुलून अनेकजण आपटतात. कारकीर्द सुरू होण्याआधीच संपते. वेळीच गैरप्रकाराला फाटा द्या. डॉ. सुधीर निरगुडकर लिहितात, अगदी सुरुवातीच्या काळांत फोर्टमध्ये बेस्टच्या रिसिव्हिंग स्टेशनच्या दुरुस्तीचे काम मिळाले. सुताराचे ऐकून मी टिकवूड ऐवजी जंगली वूड वापरले. इन्स्पेक्शनला आलेले अनुभवी गोखल्यांच्या लक्षांत आले. मी चूक मान्य केली. तेथेच शिकलो, स्वतःला घडविताना नो चीटिंग.

अनेक लघू उद्योगाचे नूतनीकरण करा. मनासारखं घडत नसतानाही सकारात्मक राहा. तुम्ही नक्की जिंकणार ही प्रेरणा मनी जागी ठेवा. हेही दिवस जातील. सातत्याने नोकरीतील नकारघंटा अनेकांनी पचविली आहे. अमिताभ बच्चनचा आवाज नाकारला, आशा भोसले यांचे माईक जवळ आल्यावर गाणे काढून घेतले, चेतन भगत यांचे प्रकाशकांनी पुस्तक नाकारले, नोकरीसाठी, मुलाखतीसाठी कुठेही कोणीही बोलावले, तर अटीत बसत नसतानाही अवश्य जा. अनुभव घ्या. सर्वसामान्यांचे खरे खूप अनुभव मी वाचले आहेत. उमेदवाराच्या विचारांत स्पष्टता असेल, शिकण्याची, मेहनत घेण्याची तयारी असेल, तर त्यांची निवड होते. स्वतःला घडविताना शॉर्टकट नको. कारण प्रगतिपथावर कधीही माघार नसते.

mbk1801@gmail.com

Recent Posts

अतिरेक्यांची माहिती द्या, वीस लाख रुपये मिळवा

श्रीनगर : जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे अतिरेक्यांच्या हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर पहलगाम…

6 minutes ago

Indus Water Treaty : सिंधू नदी पाणी वाटप करार स्थगित, पाकिस्तान पडणार कोरडाठाक

मुख्यमंत्री हिमंता बिस्वा यांची ट्विटर पोस्ट चर्चेत नवी दिल्ली : पहलगाममध्ये पर्यटकांवर मंगळवारी झालेल्या दहशतवादी…

24 minutes ago

Riteish Deshmukh : ‘हा’ कलाकार नदीत वाहून गेला म्हणून; रितेश देशमुखने थांबवलं ‘राजा शिवाजी’ सिनेमाचं शूटिंग

सातारा: रितेश देशमुखचा ‘राजा शिवाजी’ हा चित्रपट सध्या खूप चर्चेत आला आहे. या चित्रपटाचं शूट…

55 minutes ago

Kesari Chapter 2 : अक्षय कुमारचा ‘केसरी 2’ फ्लॉप! ६ दिवस उलटूनही गल्ला रिकामाच

मुंबई : बॉलीवूड (Bollywood) चित्रपटसृष्टीत सातत्याने नवनवीन चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येत आहेत. गेल्या काही दिवसांत…

1 hour ago

उधमपूरमध्ये चकमक सुरू, जवान हुतात्मा

उधमपूर : जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे अतिरेक्यांच्या हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू झाला. यानंतर संपूर्ण जम्मू…

1 hour ago

पाकिस्तानचे अधिकृत ट्विटर हँडल भारतात ब्लॉक

नवी दिल्ली : जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे पाकिस्तान पुरस्कृत अतिरेक्यांच्या हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू झाला.…

2 hours ago