गौतमी पाटीलचं खरं मानधन माहित आहे का? महिन्याला करते 'इतकी' कमाई

  412

सध्या मानधनाच्या आकड्यावरुन इंदूरीकर महाराज आणि गौतमी पाटील हिच्यात वाद सुरु आहेत. आधी किर्तनकार इंदूरीकर महाराज यांनी गौतमी पाटील ३ लाख घेते असा दावा केला होता. याबाबत गौतमीने इतके पैसे घेतले असते तर लोकांनी माझे कार्यक्रम केले नसते असं प्रत्युत्तर दिलंय पण गौतमीचं खरं मानधन किती आहे हे तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर पुढे वाचाच....



वादग्रस्त नर्तिका गौतमी पाटील सर्व प्रथम चर्चेत आली ती षण्मुखानंद येथे झालेल्या लावणीच्या कार्यक्रमामुळे. तिला अश्लील ठरवत त्यावेळी लावणीसम्राज्ञी सुरेखा पूणेकर यांच्यासह मेघा घाडगे हिनेही तिच्या नृत्यावर टीका केली होती.



मात्र, तरुणाई तिच्यावर फिदा आहे. तिला अनेक कार्यक्रमांच्या सुपाऱ्या नाकाराव्या लागतात इतकी तिच्याकडे  गर्दी असल्याची चर्चा आहेेे.



गौतमी पाटील हिने मेधा घाडगे हिची माफीही मागीतली होती पण तिचं तिच्या शैलीतील नृत्य ती अजूनही त्याच फटकेबाजीत करते.



काल पंढरपूर येथेही गौतमीच्या नृत्यादरम्यान गोंधळ झाला. हा गोंधळ इतका होता की पोलिसांना सौम्य लाठीचार्ज करावा लागला.



गौतमी अनेक महिला संघटनांच्या रडारवर आहे तरीही ती बिनधास्तपणे सर्वांसमोर तिचे नृत्य सादर करते.



गौतमीचा बॉयफ्रेंड कोण? याबाबतही समाजमाध्यमे, इंटरनेटवर चर्चा सुरु असते. तिच्या खासगी आयुष्याबद्दल जाणून घेण्यासाठी तरुण उत्सूक असतात.



समाजमाध्यमांवर सतत व्हायरल होणाऱ्या गौतमीला अगदी चिमुकल्यांच्या बर्थडे पासून ते नेत्यांच्या कार्यक्रमाच्या सुपाऱ्या असतात.



इंदूरीकर महाराज यांनी गौतमी पाटील हिला ३ लाख आणि मला ५ हजार वरुन हिला संरक्षण अशा आशयाचं वादग्रस्त वक्तव्य केलं होतं



गौतमी असं म्हणते तिने ५०० रुपयांपासून सुपारीची सुरुवात केलेली. त्यानंतर ती हजारभर मानधन घेत होती.



आता ती तब्बल दीड ते दोन लाख मानधन घेत असल्याची चर्चा आहे.



सहकलाकारांचे पैसे देऊन ती महिन्याला ३० ते ३५ लाख रुपये कमवत असल्याचा दावा इंटरनेटवर काही वेबसाईट्सनी केला आहे. (फोटो क्रेडिट - गुगल)
Comments
Add Comment

विठ्ठल रखुमाईचा आशीर्वाद घेत 'पुन्हा शिवाजीराजे भोसले'ची पहिली झलक प्रदर्शित

मुंबई : महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज तब्बल ३४५ वर्षांनंतर पुन्हा एकदा परतणार आहेत, तेही एका

'माऊली माऊली'... आषाढी एकादशीच्या निमित्ताने अभिनेता रितेश देशमुखने दिल्या शुभेच्छा

मुंबई: दरवर्षी होणारी पंढरीची वारी यंदाही उत्साहात सुरु आहे. आज आषाढी एकादशी असून लाखो वारकरी पायी पंढरपूरात

"श्रीरंग" तर्फे गतिमंद विद्यार्थ्यांसाठी 'सितारे जमीन पर' सिनेमाचा विशेष खेळ

मुंबई : श्रीरंग चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने गतिमंद विद्यार्थ्यांसाठी लालबाग येथील जय हिंद सिनेमा गृहात आमिर खान

संत तुकारामांची भूमिका साकारणार अभिनेता सुबोध भावे...

'संत तुकाराम’ चित्रपटाच्या प्रमोशनची सुरुवात पुण्यातून सुरु झाली आहे. हा चित्रपट १८ जुलै २०२५ रोजी चित्रपटगृहात

आता विषय संपवा.. प्रेक्षक चिडले...

निलेश साबळे राशीचक्रकार शरद उपाध्याय यांच्या सर्व टीकांना प्रत्युत्तर दिल. यासाठी त्यांनी सोशल मीडियावर एक

शरद उपाध्याय यांच्या वक्तव्यावर निलेश साबळे यांचं मुद्देसूद प्रत्युत्तर...

शरद उपाध्याय यांच्या वक्तव्यावर निलेश साबळे यांचं मुद्देसूद प्रत्युत्तर... झी मराठीवरील 'चला हवा येऊ द्या'