नवी दिल्ली: देशभरात रामनवमीला घडलेल्या हिसांचाराच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर उद्या देशभरात साजऱ्या होणाऱ्या हनुमान जयंतीसाठी केंद्रीय गृहमंत्रालयाने राज्यांना निर्देश जारी केले आहेत. तसेच महाराष्ट्रात नागपूरमध्ये खबरदारीचा उपाय म्हणून कलम १४४ जारी करण्यात आलं आहे. आज मध्यरात्रीपासून पुढच्या २४ तासांसाठी ही आचारसंहिता लागू असेल. या काळात शहरातील मद्यविक्रीची दुकाने बंद ठेवण्याचा आदेश काढण्यात आला आहे. तसेच अनोळखी व्यक्तीला आधार कार्ड शिवाय हॉटेल रूम देण्यास मज्जाव घालण्यात आला आहे. राज्यातील वाढते धार्मिक तेढ बघता नागपूर पोलीस आयुक्तांनी हा निर्णय घेतला आहे.
गुरुवारी साजरी होणार्या हनुमान जयंतीनिमित्त केंद्रीय गृह मंत्रालयाने (MHA) बुधवारी सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना एक सूचना जारी केली आहे. सर्व राज्यांनी कायदा व सुव्यवस्था राखणे, सण शांततेत पाळणे आणि समाजातील सांप्रदायिक सलोखा बिघडवणार्या घटकांवर लक्ष ठेवण्याचं काम करावं असं गृहमंत्रालयाने सांगितलं आहे. सामाजिक शांतता भंग करणारा कोणताही प्रकार घडल्यास आयोजकांना जबाबदार धरण्याच्या सूचनाही केंद्रीय गृहमंत्रालयाने दिल्या आहेत.
बुधवारी दिल्ली पोलिसांनी हनुमान जयंतीपूर्वी जहांगीरपुरी भागात फ्लॅग मार्च काढला. पोलिसांनी विश्व हिंदू परिषद आणि अन्य एका गटाला परिसरात मिरवणूक काढण्याची परवानगी नाकारली आहे. गेल्या वर्षी हनुमान जयंतीच्या दिवशी या भागात जातीय संघर्ष झाला होता, त्यात आठ पोलिस आणि एक स्थानिक रहिवासी जखमी झाले होते.
गीतांजली वाणी ज्ञानदायी स्रोत असते पुस्तक आवड जयास उजळ मस्तक नवी जीवनाची प्रगती आणि विकास…
फॅमिली काऊन्सलिंग : मीनाक्षी जगदाळे आजकाल आपण दररोज बघतोय की, अगदी लहान अथवा तरुण मुलं…
महिला पोलीस अधिकारी अश्विनी बिद्रे-गोरे यांच्या हत्येप्रकरणी खाकी वर्दीतला एकेकाळचा सहकारी पोलीस अधिकारी अभय कुरुंदकरला…
मुंबई: इंडियन प्रीमियर लीग २०२५च्या ४०व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने लखनऊ सुपर जायंट्सवर ८ विकेट्सनी विजय…
मुंबई : महाराष्ट्रात पहिली ते पाचवीपर्यंत इंग्रजीबरोबर हिंदी भाषाही सक्तीची करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयावर टीकेची…
मुंबई: जम्मू-काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाम येथे आज, मंगळवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सुमारे २७ जणांचा मृत्यू…