तर उद्धव ठाकरेंना घराबाहेर पडू देणार नाही

चंद्रशेखर बावनकुळेंनी दिली उद्धव ठाकरेंना शेवटची वॉर्निंग


मुंबई : उद्धव ठाकरेंनी मर्यादा सोडली तर आम्हीही ऐकणार नाही. तुम्ही आमच्या नेत्यांना बोलणार असाल तर आम्ही सोडणार नाही. आज तुम्हाला शेवटची वॉर्निंग देत आहे. यापुढे फडणवीसांबाबत काही बोललात तर तुम्हाला घराबाहेरही पडू देणार नाही, असा थेट इशारा भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिला आहे.


ठाण्यात ठाकरे गटाच्या महिला कार्यकर्त्याला झालेल्या मारहाणी प्रकरणी बोलत असताना उद्धव ठाकरे यांनी आज गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याची मागणी केली. तसेच फडणवीस यांचा उल्लेख लाचार, फडतूस गृहमंत्री असा केला. या टीकेवर बावनकुळे यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.


"उद्धव ठाकरे यांनी आज फडणवीसांबाबत केलेल्या वक्तव्याने मर्यादा ओलांडली आहे. पण अजूनही आम्ही त्यांना आज शेवटची संधी देत आहोत. यापुढे जर आमच्या नेत्यांबाबत अशी वक्तव्य करणार असाल तर तुम्हाला सोडणार नाही. तुमचे घराबाहेर पडणे मुश्कील होईल. ज्या फडणवीसांनी तुम्हाला भावासारखं प्रेम दिलं त्यांच्याबद्दल तुम्ही अशी विधानं कराल, असं कधीच वाटलं नव्हतं", असे बावनकुळे म्हणाले.


"देवेंद्र फडणवीसांवर झालेले संस्कार आडवे येत आहेत. नाहीतर त्यांनीही उद्धव ठाकरेंना त्यांच्याच भाषेत उत्तर देता आलं असतं. उद्धव ठाकरे हे एक नंबरचे विश्वासघातकी आहेत. व्यक्तिगत टीका कधीच सहन करणार नाही. भाजपा राज्यातील नंबर एकचा पक्ष आहे हे त्यांनी लक्षात घ्यावं. जर अशीच टीका सुरू ठेवली तर आम्हालाही मातोश्री बाहेर जमावं लागेल. फडणवीसांबाबत विधान करताना सांभाळून बोला. त्यांच्या ताकदीशी बरोबरी तुम्ही कधीच करू शकणार नाही", असे बावनकुळे म्हणाले.

Comments
Add Comment

FDA Notice to SRK : ‘विमल इलायची’ जाहिरातीवर FDAचा दणका; अजय, शाहरुख आणि टायगरला नोटीस

मुंबई : बॉलिवूड अभिनेते अजय देवगण, शाहरुख खान आणि टायगर श्रॉफ यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. महाराष्ट्राचे

Mumbai Family Suicide : नेव्ही नगरमध्ये नौदल कर्मचाऱ्याची कुटुंबासह राहत्या घरात आत्महत्या; पोलिसांकडून तपास सुरू

मुंबई : कुलाबा येथील नेव्ही नगर परिसरात नौदल कर्मचाऱ्यासह त्याची पत्नी आणि दोन मुलांचा मृत्यू झाल्याची

Mumbai-Ahmedabad Bullet Train : मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन लवकरच सुरू होणार

मुंबई : मुंबई-अहमदाबाद हाय-स्पीड रेल्वे कॉरिडॉर (बुलेट ट्रेन) प्रकल्पांतर्गत मुंबईतील वांद्रे कुर्ला

Mumbai Water Storage : 'मुंबई ३' जलवाहिनीच्या दुरुस्तीनंतर मुंबईकरांसाठी जलाशयांमध्ये किती पाणीसाठी ?

मुंबई : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तीन हजार मिलीमीटर व्यासाच्या 'मुंबई ३' जलवाहिनीची दुरुस्ती पूर्ण झाली आहे. या

Mumbai News : पिकअप चालकाने बड्या कंपनीच्या अधिकाऱ्याला केली मारहाण

मुंबई : सकाळी घाटकोपर पूर्व येथे ईस्टर्न एक्सप्रेस वे वर ओव्हरटेक करण्यावरून वाद झाला. एका पिकअप वाहनाच्या

Mumbai News : धक्कादायक! वाढदिवसाच्या केकमध्ये आढळली पाल, 11 जणांना विषबाधा; 4 जण ICUमध्ये

नालासोपारा : नालासोपारा पूर्वेकडील लक्ष्मी नगर परिसरातील निळकंठ अपार्टमेंटमध्ये वाढदिवसाच्या पार्टीदरम्यान