छत्रपती संभाजी नगर: काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण हे लोकसभा निवडणुकीवेळी भाजपात केव्हा जातील? तसेच काल नाना पटोले महाविकास आघाडीच्या वज्रमुठ सभेला का हजर नव्हते? याबाबत शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट यांनी गौप्यस्फोट केला आहे. तसेच १५ दिवसांच्या आत ठाकरे गटांतील अनेक आमदार शिवसेनेत येतील असा दावाही शिरसाट यांनी केला आहे. त्यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय चर्चांणा उधाण आलं आहे.
राज्यात गेल्या काही दिवसांपासून अनेक मोठ्या घडामोडी घडत आहेत. त्यानुसार येत्या लोकसभा निवडणुकीपूर्वीच काँग्रेस नेते अशोक चव्हाण हे भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. तशा हालचाली सुरु आहेत असंही संजय शिरसाट म्हणाले. एवढ्या मोठ्या नेत्याला काँग्रेसमध्ये वागणूक योग्य मिळत नसल्याचे दिसत आहे. त्यामुळं ते भाजपमध्ये जातील असे शिरसाट म्हणाले.
दरम्यान, काल महाविकास आघाडीच्या सभेला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले उपस्थित नव्हते. यावरुनही आमदार शिरसाट यांनी महाविकास आघाडीला टोला लगावला. काल झालेली सभा वज्रमुठ सभा नव्हती. नाना पटोले काल आजारी होते म्हणून आले नाहीत असे सांगत आहेत मग आज ते कोर्टात कसे गेले, यावरुनच महाविकास आघाडीत काय सुरू आहे ते दिसत आहे, असंही संजय शिरसाट यावेळी म्हणाले.
निर्बीजीकरण केंद्र उभारण्याचा प्रस्ताव विचाराधीन - वन मंत्री गणेश नाईक मुंबई : कोकणातील फळबागा आणि…
गागोदे खुर्द अनुसूचित जातीसाठी, १४ ग्रामपंचायतीत आदिवासी सरपंच पेण (वार्ताहर) : पेण तालुक्यातील ६४ ग्रामपंचायत…
हैदराबाद: इंडियन प्रीमियर लीग २०२५मधील ४१व्या सामन्यात आज २३ एप्रिलला सनरायजर्स हैदराबाद आणि मुंबई इंडियन्स…
राजनाथ सिंह यांची दिल्लीत उच्चस्तरीय बैठक; तिन्ही दलांच्या प्रमुखांची उपस्थिती नवी दिल्ली : मंगळवारी जम्मू-काश्मीरमधील…
मुंबई: इंडियन प्रीमियर लीग २०२५मध्ये आज मुंबई इंडियन्स आणि सनरायजर्स हैदराबाद यांच्यात सामना रंगतोय. मात्र…
मुख्यालयातील उपस्थितीचे महसूल विभागाचे काटेकोर आदेश मुंबई: महसूल विभाग जनतेच्या सेवेसाठी असून जनसेवेत कसूर करणाऱ्या…