छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर शहरात बुधवारी मध्यरात्री किराडपुरा भागात झालेल्या दंगलीनंतर आता शहरात मोठ्याप्रमाणावर पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. तसेच शहरात ३ रॅपिड ॲक्शन फोर्स तैनात करण्यात आल्या आहेत. तसेच आज यातील एका ५१ वर्षीय इसमाचा मृत्यू झाला आहे. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली.
या राड्यात १४ पोलीसही जखमी झाले आहेत. त्यांच्यावरही उपचार सुरू आहेत. त्यानंतर जिन्सी पोलिसात या प्रकरणी ४०० पेक्षा अधिक लोकांवर गुन्हे दाखल केले असून, ६ जणांना अटक करण्यात आले आहेत.
सध्या शहरात ७ पोलिस अधीक्षक व पोलिस उपायुक्त, ५ सहायक पोलिस आयुक्त, २८ पोलीस निरीक्षक, ५२ सहायक निरीक्षक व उपनिरीक्षक तसेच राज्य राखीव दलाच्या १२०० जवानांसह, ३ रॅपिड ॲक्शन फोर्स तैनात करण्यात आल्या आहेत. तसेच आरोपींच्या अटकेसाठी पोलिसांकडून आठ पथक तैनात करण्यात आले आहेत. सोबतच घटनास्थळी असलेल्या सीसीटीव्हीची तपासणी करून आरोपींचा शोध घेतला जात आहे.
बुधवारी रात्री शहरातील किराडपुरा परिसरात रामनवमीच्या उत्सवादरम्यान दोन गटात वाद झाला होता. या वादानंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. त्यानंतर एक मोठा जमाव झाला आणि त्यांनी थेट पोलिसांवर दगडफेक केली. तसेच पोलिसांच्या वाहने पेटवून दिली होती.
बांदीपोरा : जम्मू काश्मीरमध्ये अतिरेक्यांनी २६ पर्यटकांची हत्या केली. या घटनेनंतर भारताच्या सुरक्षा पथकांनी जम्मू…
उधमपूर : जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या अतिरेकी हल्ल्यानंतर उधमपूरमध्ये सुरक्षा पथक आणि अतिरेकी यांच्यात…
ट्विट करत दाखवलं भारतावरचं प्रेम बंगळुरू : भारतात बंगळुरू येथे २४ मे रोजी होणार असलेल्या एनसी…
पहलगाम : जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे अतिरेक्यांनी मंगळवार २२ एप्रिल २०२५ रोजी २६ पर्यटकांची हत्या…
आज २५ एप्रिल म्हणजे जागतिक मलेरिया दिन. डासांच्या चावण्यामुळे होणाऱ्या गंभीर आजारांपैकी एक मलेरिया आहे.…
मुंबई(ज्ञानेश सावंत): अठराव्या हंगामात चेन्नई व हैदराबाद यांना अजूनही सूर गवसलेला नाही.हैदराबादने सुरवातीला जो जोश…