अहमदाबाद: शेवटी तो दिवस आला, ज्याची प्रत्येकजण आतुरतेने वाट पाहत होता. इंडियन प्रीमियर लीग 2023 (IPL) चा ‘उत्सव’ सुरू होणार आहे. आज ३१ मार्च रोजी पहिला सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि गुजरात टायटन्स यांच्यात होणार आहे. याआधी, एक उद्घाटन सोहळा होणार आहे, ज्यामध्ये बॉलीवूड आणि तामिळ चित्रपटांतील तारेतारका थिरकणार आहे. बॉलीवूडमधील गायक अरजित सिंग याच्या गाण्यासोबत रश्मिका मंदाना, तमन्ना भाटिया मनोरंजनाचा बार उडवतील. दरम्यान, या सोहळ्याबाबतचे जय शहा यांचे ट्वीट व्हायरल होत आहे.
The stage is set for India’s favorite festival. The @IPL opening ceremony only a few hours away! #TATAIPL @BCCI pic.twitter.com/mFOGaXsNTa
— Jay Shah (@JayShah) March 31, 2023
तमन्ना भाटिया आणि रश्मिका मंदान्ना यांचा व्हिडिओ आयपीएलच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. यामध्ये तमन्ना स्टेजवर रिहर्सल करताना दिसत आहे. रश्मिका मंदानाही खूप उत्साही दिसत असून त्यांनी एमएस धोनी आणि विराट कोहली त्यांचे आवडते खेळाडू असल्याचे सांगितले.
View this post on Instagram
View this post on Instagram
उद्घाटन समारंभ किती वाजता सुरू होईल?
आयपीएलचा सामना संध्याकाळी ७.३० वाजता सुरू होईल, परंतु त्यापूर्वी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर संध्याकाळी ६ वाजता उद्घाटन समारंभ होईल.