लाखोंच्या बक्षिसांची होणार लयलूट…
मुंबई : अवघ्या भारताला वेड लावणारा ‘आयपीएल’ क्रिकेट स्पर्धांचा थरार शुक्रवारपासून सुरू होत आहे. आता प्रतीक्षा संपली आणि वो घडी आ गयी…म्हणत क्रिकेटप्रेमींनी आपापल्या आवडत्या संघांच्या स्पर्धा कधी व कुठे रंगणार याची जुळवणी सुरू केली आहे. जवळ जवळ दोन महिन्यांच्या रंगतदार, बहारदार आणि उत्तरोत्तर रंगत जाणाऱ्या उत्कंठावर्धक क्षणांचे साक्षिदार होण्यासाठी ‘प्रहार’ परिवार सरसावला असून आपल्या तमाम वाचकांनाही या सोहळ्यात सामावून घेतले जाणार आहे.
दैनिक प्रहारने वाचकांसाठी आणली आहे लाखोंची बक्षिसं जिंकण्याची नामी संधी. यासाठी एका सहज, सोप्या, स्पर्धेत भाग घ्या. त्यासाठी फक्त ५५ कुपन्स चिकटवा व लाखोंची बक्षिसे जिंका.
‘आयपीएल’ची रंगत पाहता पाहता त्यात दडलेले काही प्रश्न ‘प्रहार’तर्फे विचारले जातील आणि त्याची अचूक उत्तरे देणाऱ्यांसाठी लाखोंची बक्षिसे दिली जाणार आहेत.
काय आहेत नियम व अटी?
- स्पर्धेचा कालावधी १ एप्रिल २०२३ ते २९ मे २०२३ असेल.
- वरील कालावधीत दररोज एक कुपन व त्यावर एक प्रश्न प्रसिद्ध केला जाईल.
- त्या प्रश्नाचे उत्तर त्याच अंकामध्ये असेल ते आपण शोधून कुपनवर लिहावयाचे आहे.
- प्रश्नाचे अचूक उत्तर असलेले एकूण ५५ कुपन प्रसिद्ध होणाऱ्या तक्त्यावर चिकटवायचे आहे.
- तक्त्यावर आपले संपूर्ण नाव, पत्ता, संपर्क क्रमांक असणे आवश्यक आहे.
- संपूर्ण भरलेला अचूक तक्ता प्रहार कार्यालयात १० जून २०२३ पर्यंत मिळेल अशा बेताने पाठवा.
- वृत्तपत्रातली कात्रणं बक्षिसांसाठी पात्र ठरतील. झेरॉक्स, फाटलेल्या, खराब झालेल्या, अपूर्ण व चुकीच्या प्रवेशिका बाद ठरवण्यात येतील.
- स्पर्धेचा निकाल सोडतीद्वारे सर्वांसमक्ष काढला जाईल.
- बक्षीस समारंभाची तारीख, वेळ, ठिकाण नंतर प्रहारमध्ये प्रसिद्ध केले जाईल.
- बक्षीसपात्र व्यक्तींनी सोबत ओळखपत्र जसे आधारकार्ड, पॅनकार्ड किंवा शासकीय ओळखपत्र आणणे आवश्यक आहे.
- प्रहारचे कर्मचारी व त्यांच्या परिवारास स्पर्धेत भाग घेता येणार नाही.
अधिक माहितीसाठी संपर्क:
- दक्षिण मुंबई
7977464360/9869758800 - पश्चिम मुंबई
9769850854/8369550026 - मध्य मुंबई
8928764023/9819098896/ 9930920346/83693815