Saturday, May 10, 2025

महामुंबईताज्या घडामोडी

बुकी अनिल जयसिंघानीच्या अडचणीत वाढ, मॅच फिक्सिंगचं मोठं रॅकेट उघड

बुकी अनिल जयसिंघानीच्या अडचणीत वाढ, मॅच फिक्सिंगचं मोठं रॅकेट उघड

मुंबई: बुकी अनिल जयसिंघानीच्या अडचणीत आणखी वाढ होणार आहे. अनिल जयसिंघानी आणि फरार असलेला बुकी रमेश यांच्यातील फोनवरील संभाषण समोर आलं असून यात १ हजार ५०० कोटींचं मॅच फिक्सींगचं रॅकेट उघडं झालं आहे. दरम्यान या रॅकेटमध्ये क्रिकेटपटू आणि पोलिसांचाही समावेश असल्याचं समोर आलं आहे.


या ऑडिओ क्लिपमधून अनेक धक्कादायक बाबी उघड झाल्या. यात अनिल जयसिंघानी रमेश नावाच्या एका बुकीसोबत बोलत होते. या संभाषणामध्ये 'रमेश भाई मी सनी बोलत आहे, आपले अगोदर बोलण झालं होते. तुम्हाला मुंबईत जागा हवी आहे का? माझं स्वत:च ठाण्यात आणि शिर्डीमध्ये हॉटेल आहे, एकदम सुरक्षीत आहे. तुम्हाला दोन पोलिसांचे संरक्षणही देतो', असं अनिल जयसिंघानी बोलत असल्याचे संभाषण समोर आले आहे. यामुळे आता या रॅकेटमध्ये पोलिसांचाही समावेश असल्याचे उघडकीस झाले आहे.


पोलीस या प्रकरणी अधिक चौकशी करत आहेत. गेल्या काही महिन्यांपासून अनिल जयसिंघानी फरार होता. अमृता फडणवीस यांना लाच देण्याच्या प्रकरणी अनिक्षा जयसिंघानीला ताब्यात घेतल्यानंतर या प्रकरणी तपास सुरू झाला. काही दिवसातच पोलिसांनी अनिल जयसिंघानीला गुजरातमधून ताब्यात घेतले. आता या प्रकरणी आणखी नवीन खुलासे होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Comments
Add Comment