नवी दिल्ली : राहुल शेवाळे यांनी दिल्ली उच्च न्यायालयात दाखल केलेल्या मानहानी प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयाने संजय राऊत, उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांना समन्स बजावले आहे. कोर्टात प्रत्यक्ष उपस्थित राहण्याचे आदेशही दिल्ली उच्च न्यायालयाने दिले आहेत.
शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे यांनी दिल्ली उच्च न्यायालयात एक मानहानी प्रकरणी एक याचिका दाखल केली आहे. या याचिकेत शिंदे गटातील आमदार, खासदारांबाबत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आमदार आदित्य ठाकरे यांनी आक्षेपार्ह वक्तव्य केली असल्याचा उल्लेख करण्यात आला आहे.
या प्रकरणी दिल्ली उच्च न्यायालयाने आज याचिका दाखल करुन घेतली आणि खासदार संजय राऊत, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आमदार आदित्य ठाकरे यांना समन्स बजावले आहे. तसेच, कोर्टाने तिघांनाही याप्रकरणी स्वतः वैयक्तिकरित्या कोर्टात हजर राहून या आरोपांसंदर्भात स्वतःची बाजू मांडावी, अशा सूचनाही न्यायालयाकडून देण्यात आल्या आहेत. दिल्ली उच्च न्यायालयाने यासंदर्भात अनेक प्रश्नही उपस्थित केले आहेत.
सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर म्हणजेच, गूगल, फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटरवर संजय राऊत, उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांनी शिंदे गटातील आमदार, खासदार यांच्यासंदर्भात केलेली वक्तव्य अजुनही आहेत. त्यामुळे दिल्ली उच्च न्यायालयाने या प्रकरणी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मविरोधात नोटीस काढली आहे. तसेच, त्यांना विचारणा केली आहे की, तुमच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अद्यापही या तिघांनी आमदार, खासदारांबाबत केलेल्या वक्तव्यांसंदर्भात पोस्ट आहेत. त्या हटवण्यात का आलेल्या नाहीत, यासंदर्भात खुलासा करण्यास सांगितले आहे.
दरम्यान, याप्रकरणाची पुढची सुनावणी १७ एप्रिल रोजी दिल्ली उच्च न्यायालयात पार पडणार आहे. या सर्व घडामोडींमध्ये ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आमदार आदित्य ठाकरे हे तिघेही दिल्ली उच्च न्यायालयात हजर राहणार का? आणि न्यायालयात काय स्पष्टीकरण देणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
जलतरण शिकतानाच ११ वर्षांच्या मुलाचा बुडून मृत्यू; क्रीडा संकुल व्यवस्थापनावर गुन्हा दाखल भायंदर : उन्हाळी…
व्हॅटिकन सिटी : श्वसनाच्या आजाराने त्रस्त असलेल्या पोप फ्रान्सिस यांचे ८८ व्या वर्षी निधन झाले.…
पुणे : शिवनेरी किल्ल्यावर पुन्हा एकदा पर्यटकांवर मधमाशांनी हल्लाबोल केला आहे. या हल्ल्यात १६ जण…
व्हॅटिकन सिटी : रोमन कॅथलिक चर्चचे २६६ वे सर्वोच्च धर्मगुरु पोप फ्रान्सिस यांचे सोमवारी ८८…
महिलांना त्यांच्या पायांचे सौंदर्य वाढवण्यासाठी अँकलेट परिधान करायला फार आवडते. विवाहित महिलांसोबतच अविवाहित मुलींनाही अँकलेट…
मुंबई : लव रंजन आणि अंकुर गर्ग यांच्या लव फिल्म्सने ‘देवमाणूस’मधून मराठी सिनेसृष्टीत पदार्पण केले…