जाणून घ्या जागतिक रंगभूमी दिनाचा इतिहास...

मुंबई: आज जागतिक रंगभूमी दिन. आजपासून बरोबर ६२ वर्षांपूर्वी हा दिवस साजरा करायला सुरूवात झाली. १९६१ मध्ये ‘युनेस्को’च्या इंटरनॅशनल थिएटर इन्स्टिट्यूटने या दिवसाची सुरुवात केली. पहिला जागतिक रंगभूमी दिन १९६२ मध्ये साजरा झाला.


जगाच्या रंगमंचावरील पहिले नाटक अथेन्समधील एक्रोपोलिस येथे असलेल्या डायोनिससच्या थिएटरमध्ये झाले. हे नाटक पाचव्या शतकाच्या सुरुवातीचे मानले जाते. यानंतर थिएटर संपूर्ण ग्रीसमध्ये वेगाने पसरले.


इंटरनॅशनल थिएटर इन्स्टिट्यूटतर्फे दरवर्षी एक कॉन्फरन्स आयोजित केली जाते. ज्यामध्ये जगभरातून एक थिएटर आर्टिस्ट निवडला जातो, जो जागतिक रंगभूमी दिनानिमित्त जगाला एक खास संदेश देतो. १९६२ साली ज्यो कॉक्चू यांनी हा संदेश दिला होता. २००२ मध्ये भारतातील प्रसिद्ध अभिनेते आणि साहित्यिक गिरीश कर्नाड यांना हा मान मिळाला होता. हा संदेश सुमारे ५० भाषांमध्ये अनुवादित केला जातो.


रंगभूमी, नाट्यसंहिता, नाट्यदिग्दर्शक, रंगभूषा, वेषभूषा, रंगमंदिर, रंगमंच या सर्व गोष्टी रंगभूमीशी निगडित आहेत. पूर्वी आजच्यासारखे रंगमंच नव्हते तेव्हा एका मैदानात रंगमंदिर उभारले जात असे. पुढे हळूहळू आजच्यासारखी बंदिस्त रंगमंचाची संकल्पना अस्तित्वात आली. विष्णुदास भावे यांच्या ‘सीता स्वयंवर’ या मराठीतल्या पहिल्या संवाद आणि संगीत नाटकाचा १८४३ मध्ये सांगलीत प्रयोग झाला.


एकेकाळच्या बहारलेल्या मराठी नाट्यसृष्टीला आता उतरती कळा लागली आहे. मुबंई-पुणे वगळता व्यावसायिक नाट्य निर्मितीचे प्रयत्न रसिकांचा प्रतिसाद घटल्याने बंद पडले आहेत.

Comments
Add Comment

'निडर नारी' वॉकेथॉन

मुंबई: एमओसी कॅन्सर केअर अँड रिसर्च सेंटर (एमओसी विलेपार्ले) ने त्यांच्या निडर नारी उपक्रमाचा भाग म्हणून १ मार्च

चैत्र चाहूल २०२६ चे 'ध्यास' आणि रंगकर्मी सन्मान

मुंबई : गेली दोन दशके गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर “चैत्र चाहूल” हा मराठी संस्कृती आणि मराठी भाषेला वाहिलेला

एलपीजी सिलेंडरची साठेबाजी करणाऱ्यांवर कारवाई करा, महसूलमंत्री बावनकुळेंचे निर्देश

मुंबई : पश्चिम आशियात अमेरिका आणि इस्रायल हे दोन देश इराण विरुद्ध लढत आहे. या युद्धाने आता १२ व्या दिवसांत प्रवेश

गोरेगाव - मुलुंड जोड मार्ग प्रकल्‍पातील जुळ्या बोगद्याच्‍या खोदकामासाठी बोगदा खनन संयंत्राचे सुटे भाग 'शाफ्ट'मध्ये उतरवण्याची प्रक्रिया सुरू

मुंबई: गोरेगाव -मुलुंड जोड मार्ग (GMLR) प्रकल्पाच्या टप्पा ३ - ब अंतर्गत दादासाहेब फाळके चित्रनगरी परिसरात उभारण्यात

मराठी शाळांमधील गळती रोखण्यासाठी महापालिका शिक्षण समितीची अनोखी मागणी

मुंबई: महानगरपालिका शाळांमधील विद्यार्थिनींच्या शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या

प्रत्येक मेट्रो रेल्वे स्थानकाबाहेर मोठ्या क्षमतेचे पंप; महापालिका आयुक्तांनी दिले निर्देश

मुंबई: यंदाच्या पावसाळ्या दरम्यान पावसाच्या पाण्याचा निचरा अधिकाधिक जलद गतीने व्हावा, यासाठी महानगरपालिकेच्या