पाथर्डी फाट्याजवळ मॅनेजरचा खून करून हल्लेखोरांनी चारचाकी कार नेली पळवून

  423

नाशिक (प्रतिनिधी) : येथील इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत पाथर्डी फाट्याजवळील हॉटेल अंगणजवळ अज्ञात हल्लेखोरांच्या हल्ल्यात योगेश मोगरे या एका कंपनीत काम करणाऱ्या मॅनेजरचा खून झाल्याने शहरात एकच खळबळ उडाली.


कंपनी मॅनेजरवर प्राणघातक हल्ला करून गंभीर जखमी करत हल्लेखोरांनी मॅनेजरची चारचाकी कार पळवून नेली आहे. विशेष म्हणजे ज्या ठिकाणी ही घटना घडली त्याच्या काही अंतरावर खासदार संजय राऊत हे एका हॉटेलमध्ये थांबले होते. म्हणजेच त्या ठिकाणी व परिसरात आजूबाजूला पोलीस बंदोबस्त देखील असावा. तरीदेखील इतका गंभीर गुन्हा घडल्याबाबत आश्चर्य व्यक्त होत आहे. पांडव लेण्याच्या पायथ्याशी असलेल्या हॉटेल आंगणजवळ एका कंपनीत मॅनेजर असलेल्या योगेश मोगरे यांची चारचाकी कार अडवून अज्ञात गुंडांनी त्यांच्यावर धारधार हत्यारांनी वार करून गंभीर जखमी केले होते. त्यांनतर त्यांना उपचारार्थ रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र या हल्ल्यात मॅनेजर मोगरे यांचा मृत्यू झाला.


योगेश मोगरे हे आपले काम उरकल्यानंतर गरवारे येथील सर्विस रोडवरून पाथर्डी फाट्याकडे चारचाकी कारने जात होते. त्यावेळी हॉटेल आंगणसमोर दोन अज्ञात गुंडांनी त्यांची गाडी अडवून थांबवले आणि धारदार कोयते, हत्यारे काढून त्यांनी मोगरे यांच्या अंगावर, पाठीवर तसेच मानेवर सपासप वार केले.या हल्ल्यात मोगरे हे गंभीर जखमी होऊन रक्ताच्या थारोळ्यात पडले असताना एका रिक्षाचालकाने त्यांना पाथर्डी फाटा येथील एका खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारांदरम्यान त्यांचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, उपायुक्त प्रशांत बच्छाव, आयुक्त सोहेल शेख, वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय बांबळे यांसह अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी पाहणी करत हल्लेखोरांचा शोध सुरू केला आहे. या घटनेबाबत रात्री इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Comments
Add Comment

नाशिक कुंभपर्वासाठी कुंभमेळा प्राधिकरणाला कायदेशीर कवच!

नाशिक: प्रयागराजच्या धर्तीवर नाशिकमधील सिंहस्थ कुंभपर्वासाठी स्थापन झालेल्या कुंभमेळा प्राधिकरणाला लवकरच

ना. भुजबळांकडून लासलगावी पुलाच्या कामाची पाहणी

मुख्य बाजारपेठेतील पुलाचे काम दोन महिन्यांत पूर्ण करण्याचे निर्देश लासलगाव : लासलगाव पाटोदा रस्त्यावरील

गंगापूर धरणातून विसर्ग वाढला ; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

नाशिक : नाशिक जिल्ह्यात गेले चार पाच दिवसात पावसाची संततधार कायम असल्याने , जिल्ह्यातील प्रमुख धरणांचा पाणीसाठा

कांदासाठा घोटाळ्यावर हायकोर्टाची तत्काळ कार्यवाही

विश्वासराव मोरे यांच्या याचिकेला ऐतिहासिक यश पिंपळगाव : गेल्या दहा वर्षांमध्ये देशभरातील शेतकऱ्यांच्या

बडगुजर यांचा प्रवेश; काही पेच, काही संदेश

नाशिक बीट‌्स : प्रताप म. जाधव उबाठातून भाजपात स्वागत करण्यात आलेल्या सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाच्या

आता शिवसेनाप्रमुखांना अनुभवताही येणार!

गंगापूर रोडवरील स्मृती उद्यानात साकारणार ‘थ्रीडी होलोग्राम’ नाशिक : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या