मुंबई: भारतात पुन्हा एकदा कोरोनाची प्रकरणे झपाट्याने वाढत आहेत. गेल्या अनेक महिन्यांनंतर आता कोरोनाचे एक हजाराहून अधिक रुग्ण समोर आले आहेत. अभिनेत्री किरण खेर काही दिवसांपूर्वीच कोरोना पॉझिटिव्ह आल्या होत्या. त्यानंतर आता बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री पूजा भट्ट हिला कोरोनाची लागण झाली. तिने आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून या वृत्ताला दुजोरा दिला आहे. यासोबतच तिने तिच्या संपर्कात आलेल्या लोकांना कोरोना चाचणी करून घ्यायचे आवाहन केले आहे.
पुजाने लिहिले की, ‘तीन वर्षांनंतर मी पहिल्यांदा पॉझिटिव्ह आढळले. तुम्ही सर्वजणांनी मास्क घालण्याची खबरदारी घ्या. कोरोना अजूनही आहे आणि लसीकरण झाल्यावरही तो तुमच्यापर्यंत पोहोचू शकतो. आशा आहे की मी लवकरच बरी होईन.
पूजा भट्ट ही चित्रपट निर्माते महेश भट्ट यांची मोठी मुलगी आहे. पूजा भट्टने अनेक बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम केले होते. पुजाचा ‘चुप’ हा शेवटचा चित्रपट होता. या चित्रपटात अभिनेता सनी देओलसह अनेक स्टार्स होते. पूजा भट्ट सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. तसेच ती प्रत्येक मुद्द्यावर आपले मत मुक्तपणे मांडते.
चेन्नई: इंडियन प्रीमियर लीग २०२५च्या ४३व्या सामन्यात आज सनरायजर्स हैदराबादने चेन्नई सुपर किंग्सला ५ विकेट्स…
पंचांग आज मिती चैत्र कृष्ण त्रयोदशी ८.३० पर्यंत नंतर चतुर्दशी शके १९४७. चंद्र नक्षत्र उत्तराभाद्रपदा…
पावसाळा आता जेमतेम सव्वा महिन्यावर आलेला आहे. पावसाळी हंगामास दरवर्षी कागदोपत्री १ जूनला सुरुवात होत…
मराठवाडा वार्तापत्र: अभयकुमार दांडगे उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत आहे. त्याच तुलनेत मराठवाड्यात तहानलेल्या गावांच्या संख्येतही…
रवींद्र तांबे ग्रामीण भागाचा विचार करता अजूनही पुरेशा मूलभूत सोयी नसल्याने नागरिक मुलांना घेऊन शहराकडे…
मुंबई: पहलगाम येथे नुकत्याच झालेल्या दुर्घटनेनंतर जखमी व त्यांच्या कुटुंबियांसाठी मुंबई महानगरपालिकेच्या टोपीवाला नॅशनल मेडिकल…