Friday, March 13, 2026

बॉलीवूडमधली 'ही' प्रसिद्ध अभिनेत्री कोरोना पॉझिटिव्ह

बॉलीवूडमधली 'ही' प्रसिद्ध अभिनेत्री कोरोना पॉझिटिव्ह

मुंबई: भारतात पुन्हा एकदा कोरोनाची प्रकरणे झपाट्याने वाढत आहेत. गेल्या अनेक महिन्यांनंतर आता कोरोनाचे एक हजाराहून अधिक रुग्ण समोर आले आहेत. अभिनेत्री किरण खेर काही दिवसांपूर्वीच कोरोना पॉझिटिव्ह आल्या होत्या. त्यानंतर आता बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री पूजा भट्ट हिला कोरोनाची लागण झाली. तिने आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून या वृत्ताला दुजोरा दिला आहे. यासोबतच तिने तिच्या संपर्कात आलेल्या लोकांना कोरोना चाचणी करून घ्यायचे आवाहन केले आहे.

पुजाने लिहिले की, 'तीन वर्षांनंतर मी पहिल्यांदा पॉझिटिव्ह आढळले. तुम्ही सर्वजणांनी मास्क घालण्याची खबरदारी घ्या. कोरोना अजूनही आहे आणि लसीकरण झाल्यावरही तो तुमच्यापर्यंत पोहोचू शकतो. आशा आहे की मी लवकरच बरी होईन.

पूजा भट्ट ही चित्रपट निर्माते महेश भट्ट यांची मोठी मुलगी आहे. पूजा भट्टने अनेक बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम केले होते. पुजाचा 'चुप' हा शेवटचा चित्रपट होता. या चित्रपटात अभिनेता सनी देओलसह अनेक स्टार्स होते. पूजा भट्ट सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. तसेच ती प्रत्येक मुद्द्यावर आपले मत मुक्तपणे मांडते.

Comments
Add Comment