मुंबई मेट्रोने सुरू केले मासिक ट्रीप पास

मुंबई : महा मुंबई मेट्रो संचलन महामंडळाने (MMMOCL) 'मुंबई १' कार्डचा वापर करून मुंबई मेट्रोने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी विशेष सवलत देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार ३० दिवसांच्या कालावधीत ४५ वेळा मेट्रो ने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी १५ टक्के सुट तर ६० वेळा प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी २० टक्के सूट मिळणार आहे. सदर सवलतीची वैधता ही ३० दिवसांच्या कालावधीसाठी मर्यादित असून त्याचा शुल्क मुंबई १ कार्डच्या माध्यमातून प्रीपेड स्वरूपात आकारला जाईल.


त्यासोबतच मुंबई मेट्रो च्या माध्यमातून मुंबईतील विविध ठिकाणी भेट देणाऱ्या मेट्रो प्रवाशांसाठी 'अमर्याद ट्रीप पास' (Unlimited trip pass) ही विशेष सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यानुसार एक दिवसीय अमर्याद ट्रीप पासचे शुल्क हे रुपये ८०, तर ३ दिवसांच्या अमर्याद ट्रीप पासचे शुल्क हे रुपये २०० इतके असेल.



मुंबई १ कार्डची उपलब्धता


मुंबई मेट्रोचे प्रवासी त्यांचे 'मुंबई १' हे नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड मुंबई मेट्रोच्या तिकीट काऊंटर आणि कस्टमर केअर काउंटरवर अल्प कागदपत्रांसह सहज मिळवू तसेच रिचार्ज करू शकतात. या कार्डचा वापर रिटेल स्टोअरमध्ये आणि बेस्ट बस प्रवासादरम्यान देखील वापरले जाऊ शकते.


मुंबईकर मेट्रो प्रवाशांसाठी अत्यंत फायदेशीर आणि उपयुक्त असणाऱ्या या सुविधांची घोषणा करताना एमएमआरडीए चे मा. महानगर आयुक्त आणि महा मुंबई मेट्रो संचलन मंडळाचे अध्यक्ष तथा मुख्य व्यवस्थापकीय संचालक एस. व्ही. आर. श्रीनिवास, भा.प्र.से., म्हणाले “मुंबई मेट्रो या पर्यावरण पूरक वाहतूक व्यवस्थेचा वापर वाढून प्रदूषण कमी करण्याच्या दृष्टीने प्रयत्नशील आहोत. मुंबईकरांचा दैनंदीन मेट्रो प्रवास हा अधिकाधिक सुखकर व्हावा या हेतूने आम्ही सातत्याने नवनवीन पर्यायांचा विचार आणि अमलबजावणी करीत आहोत. मुंबई -१ कार्ड च्या माध्यमातून सध्या सोमवार ते शनिवार ५ टक्के , रविवारी आणि राष्ट्रीय सुट्टीच्या दिवशी १० टक्के सवलत उपलब्ध आहे. मुंबई मेट्रो प्रवाशांसाठी उपलब्ध करण्यात आलेल्या या नवीन ट्रीप पास योजनेमुळे तिकीट प्रक्रिया ही अधिक सुलभ होऊन प्रवाशांच्या वेळेची आणि पैशांची बचत होईल. त्यासोबतच या योजनेमुळे मुंबई मेट्रो प्रवासादरम्यान जास्तीतजास्त प्रवाशांना मुंबई-१ हे नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड वापरण्यासाठी प्रोत्साहन मिळेल.”



या सुविधेबाबतची वैशिष्टे आणि सुचना


• ४५ आणि ६० ट्रीप पास हा खरेदीच्या तारखेपासून ३० दिवसांसाठी वैध राहील.


• अनलिमिटेड ट्रीप पास – ८० रुपये ( वैधता १ दिवस ), २०० रुपये ( वैधता ३ दिवस )


• १ ट्रीप – एकेरी प्रवास


• पास नुसार मुंबई मेट्रोने प्रवास हा केवळ पास मध्ये निश्चित केलेल्या गंतव्य स्थानकांदरम्यानच्या प्रवासासाठी मर्यादित असतील.


• मुंबई १ कार्ड हरवल्यास कर्डमधील शिल्लक रक्कम ही परत मिळवता येणार नाही.


• मुंबई १ कार्ड खराब झाल्यास, काम करत नसल्यास अथवा हरवल्यास नवीन कार्डासाठी रुपये १०० इतके शुल्क आकारले जातील.


• ट्रीप पासेस फक्त मुंबई १ नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्डसाठी वैध आहेत

Comments
Add Comment

बांद्रा टर्मिनसजवळ बेकायदेशीर झूंजीतून वाचवलेल्या मेंढ्यांना 'पेटा इंडिया'कडे सोपवले

मुंबई: बांद्रा टर्मिनसजवळ एका बेकायदेशीर झूंजीत वापरल्या गेलेल्या दोन मेंढ्यांना 'पीपल फॉर द एथिकल ट्रीटमेंट ऑफ

एल्फिन्स्टनला मिळणार मुंबईचा पहिला दुमजली रेल्वे पूल

मुंबई: ११० वर्षे जुना एल्फिन्स्टन रोड ओव्हर ब्रिज १२ सप्टेंबर २०२५ रोजी बंद झाल्यानंतर, मध्य मुंबईतील

बनावट नकाशे तयार करणाऱ्यांवर कारवाई करा; 'त्या' अहवालाचा फेरविचार करा!

पालकमंत्री आशिष शेलार यांचे निर्देश मुंबई : मुंबई उपनगर मधील विकास आराखडा आरक्षणातील भूमी अभिलेख

मनसे नेते प्रकाश महाजन यांचा पक्षाला रामराम

मुंबई: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) नेते आणि प्रवक्ते प्रकाश महाजन यांनी पक्षातून राजीनामा दिला आहे.

राज्यात 'मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजना' सुरू होणार; मच्छीमारांना मिळणार दुहेरी लाभ!

मुंबई: महाराष्ट्रातील मच्छिमार बांधवांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. केंद्र सरकारच्या 'प्रधानमंत्री

राज्यातील बारव व ऐतिहासिक विहिरींचे फेर सर्वेक्षण करणार : मंत्री ॲड आशिष शेलार

मुंबई : ऐतिहासिक दृष्ट्या अत्यंत महत्त्वाच्या असणाऱ्या महाराष्ट्रातील बारव व विहीरींचे जिल्हा निहाय सर्वेक्षण