उद्धव यांच्यामुळेच अनेकजण पक्षातून बाहेर पडले

गुढीपाडव्याच्या संध्येला राज ठाकरेंकडून उद्धव यांचा समाचार


मुंबई: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्यात बोलताना शिवसेनेच्या सध्याच्या झालेल्या स्थितीवर सडकून टीका केली. यावेळी त्यांनी शिवसेना आणि धनुष्यबाण कुणाचा यावरुन झालेल्या वादानं वेदना झाल्याचं म्हटलं. उद्धव ठाकरे यांनी अनेकांना पक्षातून बाहेर पडण्यासाठी स्थिती निर्माण केल्याचं राज ठाकरे म्हणाले.


राज ठाकरे म्हणाले, भाजप आणि शिवसेनेनं एकत्रितपणे निवडणुका लढल्या होत्या. मात्र, आपल्या शिवाय भाजप सत्ता स्थापन करु शकत नाही हे लक्षात आल्यावर उद्धव ठाकरे अडीच वर्ष मुख्यमंत्री राहिले. बाळासाहेब असते तर त्यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत जाऊ दिलं असतं का, असा सवाल राज ठाकरेंनी केला. शिवसेनेच्या आजच्या स्थितीला राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंना जबाबदार धरलं.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना देखील राज ठाकरे यांनी सल्ला दिला. मुख्यमंत्रिपद तुम्हाला मिळालं आहे तर शेतकऱ्यांची कामं करा, पेन्शनचा प्रश्न मिटवा, असं राज ठाकरे म्हणाले. उद्धव ठाकरे जिकडं सभा घेतील तिकडे सभा घेत फिरु नका, असं राज ठाकरे म्हणाले.


महाराष्ट्रात मागच्या सरकारच्या काळात मनसैनिकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ते गुन्हे राज्य सरकारनं मागं घ्यावेत, अशी मागणी राज ठाकरे यांनी केली. हाजी अली समुद्रातील अनधिकृत बांधकाम येत्या महिनाभरात तोडा नाहीतर तेथे मोठे गणपती मंदिर बांधू, असा इशारा राज ठाकरेंनी दिला.


राज ठाकरे यांनी मनसैनिकांना मशिदीवरील भोंग्यांचा मुद्दा सोडला नसल्याचा संदेश आजच्या भाषणातून दिला. मनसैनिकांनी दक्ष राहावं, असं देखील राज ठाकरे म्हणाले. राज्यातील सत्तासंघर्षाचं प्रकरण सुप्रीम कोर्टात असल्यानं सरकारचं लक्ष तिकडं असल्यावरुन राज ठाकरेंनी टीका केली. आताच विधानसभा निवडणुका घेण्याचं आव्हान राज ठाकरेंनी दिलं.

Comments
Add Comment

उन्नती, प्रगती, विकासासाठी मुंबईवर महायुतीचा भगवा फडकलाच पाहिजे!

भाजपा मुंबई अध्यक्ष अमित साटम यांचे महायुतीच्या उमेदवारांना निवडून आणण्याचे आवाहन मुंबई (खास प्रतिनिधी) :

विश्वचषक विजेत्या खेळाडूंसह प्रशिक्षकांचाही राज्य सरकारकडून विशेष गौरव! जेमिमा, स्मृती आणि राधा यादव यांना प्रत्येकी २.२५ कोटी!

मुंबई : भारतीय महिला क्रिकेट संघाने आयसीसी महिला विश्वचषक २०२५ जिंकून देशासाठी ऐतिहासिक कामगिरी केली आहे.

दादरच्या 'स्टार मॉल'मध्ये भयंकर आग!

सेनाभवनसमोर असलेल्या मॉलमध्ये मॅकडोनाल्ड्सच्या किचनमध्ये आग! मुंबई : दादर पश्चिम येथील गजबजलेल्या स्टार

मेट्रो प्रवाश्यांसाठी महत्वाची बातमी ! राज्य सरकार दरवाढीच्या तयारीत

मुंबई : रेल्वे प्रमाणे मेट्रोलाही मुंबईकरांच्या जीवनात महत्वाचे स्थान आहे. मुंबईत २०१४ पासून सुरू झालेले

कीर्तनकार इंदुरीकर महाराज यांच्या मुलीचा शाही साखरपुडा चर्चेत

मुंबई : आपल्या कीर्तनातून समाजप्रबोधन करणारे प्रसिद्ध कीर्तनकार निवृत्ती महाराज देशमुख म्हणजेच इंदुरीकर

मानखुर्द, गोवंडी, शिवाजीनगर, चेंबूरमधील नागरिकांना धो धो पाणी, चेंबूर अमर महल ते ट्रॉम्बे जलाशय जलबोगदा महिना अखेर होणार कार्यान्वित

मुंबई (सचिन धानजी): मुंबई महापालिकेच्यावतीने हाती घेण्यात आलेल्या चेंबूर अमर महल ते ट्रॉम्बे जलशयापर्यंतच्या