साईबाबा संस्थानच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना न्याय द्या: बाळासाहेब थोरात

मुंबई: अध्यात्मिकदृष्ट्या देशात अतिशय महत्त्वाच्या असणाऱ्या व अनेक भाविकांचे श्रद्धास्थान असणाऱ्या शिर्डी येथील साईबाबा संस्थानच्या ५९८ कंत्राटी कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करून घ्यावे तसेच वेतनातील फरक त्वरित द्यावा अशी मागणी काँग्रेस विधीमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात यांनी विधानसभेत केली आहे.


थोरात म्हणाले की, शिर्डी साई संस्थानातील सुमारे ५९८ कंत्राटी कर्मचारी साधारणपणे २० ते २२ वर्षांपासून सेवेत आहेत. मागील काळात १ हजार ०५२ कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायम सेवेत रुजू केले मात्र हे ५९८ कर्मचारी अजूनही कंत्राटी पद्धतीने काम करत आहेत. कायम सेवेतील कर्मचाऱ्यांना ४० हजार रुपये वेतन मिळते तर कंत्राटी कामगारांना १० हजार रुपयांवर काम करावे लागत आहे. या तुटपूंज्या पगारावर त्यांचा घरखर्च तसेच मुलांच्या शिक्षणाचा खर्च भागत नाही. गेल्या २० वर्षांपासून हे कामगार अन्याय सहन करत आहेत. सरकार याप्रश्नी सकारात्मक आहे असे म्हणत आहे. त्यामुळे या कर्मचाऱ्यांना सेवत कायम करुन घ्यावे व ऑगस्ट २००९ पासून पूर्वलक्षी प्रभावाने वेतनाचा फरक देऊन त्यांच्यावरील अन्याय दूर करावा, असेही थोरात म्हणाले.

Comments
Add Comment

Rupali Chakankar : अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकरांची SIT चौकशी

नाशिक : राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली चाकणकर अखेर नाशिकमध्ये रविवारी विशेष पोलीस पथकाच्या (एसआयटी)

'Corporate Jihad' : नाशिक ‘कॉर्पोरेट जिहाद’प्रकरणी ५० पानांचा अहवाल मुख्यमंत्र्यांना सादर, २५ हून अधिक शिफारसी

मुंबई : नाशिकमधील बहुराष्ट्रीय कंपनीतील ‘कॉर्पोरेट जिहाद’' (Corporate Jihad') प्रकरणी सखोल चौकशी करून राष्ट्रीय महिला

Nashik : नाशिक-त्र्यंबकेश्वरमध्ये वाढविणार खाट क्षमता, सिंहस्थ २०२७ साठी व्यापक आरोग्य यंत्रणा उभारणार

नाशिक : सिंहस्थ कुंभमेळा २०२७ (Simhastha Kumbh Mela 2027) दरम्यान भाविकांना तातडीची आणि सक्षम आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्यासाठी

Nashik : सिंहस्थ कुंभमेळा २०२७ तयारीला गती , कुंभमेळा प्राधिकरणाच्या बैठकीत महत्त्वाच्या प्रस्तावांना मंजुरी

नाशिक : सिंहस्थ कुंभमेळा २०२७ च्या (Simhastha Kumbh Mela 2027) तयारीला गती देण्यासाठी नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा

Nashik News : नाशिक शहरात अतिक्रमणाविरोधात मोठी कारवाई

नाशिक : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरांत विविध विकासकामांना गती प्राप्त झाली आहे. शहरातील अतिक्रमण

Nashik Crime : किरकोळ वादातून सलून चालकाची निर्घृण हत्या, परिसरात खळबळ

Nashik Crime : नाशिकमधील आडगाव नाका परिसरातील (Aadgaon Naka Area) मधुर मिलन स्वीट्ससमोर आज पहाटे हत्येचा थरार रंगला. शनिवारी पहाटे