ज्येष्ठ अभिनेते भालचंद्र कुलकर्णी यांचे निधन

कोल्हापूर : ज्येष्ठ अभिनेते भालचंद्र कुलकर्णी यांनी आज वयाच्या ८८व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. कोल्हापूरमधील कळंबा शिवप्रभू नगर येथील निवासस्थानी त्यांची सकाळी सहा वाजता निधन झाले.


भालचंद्र यांनी असला नवरा नको गं बाई, पिंजरा, मुंबईचा जावई, सोंगाड्या, थरथराट, खतरनाक अशा अनेक मराठी चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्यांनी वेगवेगळ्या भूमिका देखील साकारल्या. त्यांना आतापर्यंत विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.


भालचंद्र यांनी आजवर ३०० पेक्षा जास्त चित्रपटांमध्ये काम केले आहे. मात्र, गेल्या अनेक वर्षांपासून ते अभिनय क्षेत्रापासून लांब होते. याकाळात भालचंद्र हे कोल्हापूरमधील कळंबा शिवप्रभू नगर येथील एका प्रायव्हेट हायस्कूलमध्ये शिक्षक आणि मुख्याध्यापक म्हणून काम करत होते.


‘कुलस्वामिनी अंबाबाई’ या १९८४ साली प्रदर्शित झालेल्या चित्रपटातील ‘चांगभलं रं चांगभलं, देवा ज्योतिबा चांगभलं’ हे गाणे खूप लोकप्रिय आहे. आजही नवरात्रीत हे गाणे नक्कीच ऐकायला मिळते.


भालचंद्र यांनी फक्त मराठी नाही तर कोल्हापुरात प्रदर्शित झालेल्या काही हिंदी चित्रपटांमध्येही काम केले. भालचंद्र यांची खूप साधी राहणी होती. भालचंद्र यांनी सगळ्या चित्रपटांमध्ये प्रत्येक भूमिका ही परफेक्ट असली पाहिजे यासाठी ते प्रयत्न करायचे. ते अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे काही वर्षे सचिव तर अनेक वर्षे संचालक होते. त्यांना महामंडळाच्या वतीने नुकताच चित्र भूषण पुरस्कार देण्यात आला होता.


भालचंद्र यांनी मर्दानी (१९८३), मासूम (१९९६), झुंज तुझी माझी (१९९२), हळद रुसली कुंकू हसलं (१९९१), माहेरची साडी (१९९१) या चित्रपटात भूमिका केल्या आहेत. चित्रपट महामंडळाच्या सांस्कृतिक, चित्रपट विषयक तसेच आंदोलनात्मक कामातही ते सक्रिय होते. शालिनी, जयप्रभा स्टुडिओचे जतन व्हावे, या लढ्यात ते अग्रभागी होते. त्यांनी काही काळ शिक्षक म्हणून ही काम केले होते.


Comments
Add Comment

Kondhwa Search Operation : एटीएसचा कोंढव्यात शिरकाव! गल्लीबोळामध्ये झळकले आय लव मोहम्मदचे बॅनर, पोलीस तपास सुरू

पुणे : पुण्यातील कोंढवा (Kondhwa) परिसर आज पहाटेपासूनच तपास यंत्रणांच्या छापामारीमुळे चर्चेत आला आहे. तपास यंत्रणांची

एमपीएससीच्या ९३८ पदांसाठी भरती जाहीर

मुंबई (प्रतिनिधी): महाराष्ट्र लोकसेवा आयोगमार्फत महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षासाठी जाहिरात

सात वीज कर्मचारी संघटनांचा संप बेकायदेशीर; ‘मेस्मा’लागू ; संपकाळातील सुरळीत वीजपुरवठ्यासाठी महावितरण सज्ज

मुंबई : महावितरणमधील सात वीज कर्मचारी संघटनांच्या संयुक्त कृती समितीने ९ ते ११ ऑक्टोबरपर्यंत संप पुकारला आहे. या

पुणे मेट्रो ‘कॅशलेस’ व्यवहारांमुळे राज्यात अव्वल

पुणे : केंद्र सरकारच्या ‘डिजिटल इंडिया’ या महत्त्वाकांक्षी उपक्रमाला प्राधान्य दिल्याने ‘कॅशलेस’ व्यवहारात

पुण्याला पावसाने झोडपले

पुणे : गेले काही दिवस विश्रांती घेतलेल्या पावसाने बुधवारी दुपारी तीनपासून पुन्हा एकदा पुण्याला अक्षरश: झोडपले.

आरोग्य विभाग करणार १७०० रुग्णवाहिकांची खरेदी!

राज्यातील सर्व रुग्णवाहिकांचे होणार एकत्रित नेटवर्क व संचलन मुंबई : आरोग्य विभागाअंतर्गत रुग्णवाहिका सेवा