पेडन्यूजवाल्यांचा बाजार आटोपला!

  489

न्यूज जीपीटीमुळे प्रसारमाध्यमातील प्रतिनिधींच्या नोक-याही धोक्यात?


नवी दिल्ली : मायक्रोसॉफ्टने आपल्या ओपन एआयच्या माध्यमातून 'चॅट जीपीटी'चे (Chat GPT) नवीन 'न्यूज जीपीटी' (NewsGPT) चॅनल लाँच केले आहे. हे चॅनल नि:पक्षपातीपणे बातम्या देणार असल्याचा दावा कंपनीच्या वतीने केला आहे. यामुळे 'पेडन्यूज' चालवणा-यांचा बाजार आटोपला असून प्रसार माध्यमातील प्रतिनिधींच्या नोक-याही धोक्यात आल्या आहेत.


एआय चॅटबोटच्या चॅट जीपीटीने सध्या टेक जगतात चांगलाच धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे अनेकजण धास्तावले आहेत. आता तर चॅट जीपीटीने संपूर्णपणे कृत्रिम बुद्धिमत्तेद्वारे तयार केलेले न्यूज जीपीटी नावाचे जगातील पहिले न्यूज चॅनेल सुरू केले आहे. त्यामुळे प्रसार माध्यमातील प्रतिनिधींच्या नोकऱ्या धोक्यात आल्या आहेत. बातम्यांच्या जगात हा 'गेम चेंजर' ठरणार असल्याचे 'न्यूज जीपीटी'चे सीईओ अ‍ॅलन लेव्ही यांनी स्पष्ट केले आहे.


गेल्या अनेक काळापासून प्रसारमाध्यमे पक्षपात आणि व्यक्तिनिष्ठ वृत्तांकन करत असल्याचा आरोप करण्यात येत आहे. त्यामुळे न्यूज जीपीटीच्या माध्यमातून आम्ही दर्शकांना कोणताही छुपा अजेंडा किंवा पक्षपातीपणाशिवाय तथ्ये आणि सत्य प्रदान करण्यास सक्षम असल्याचे अ‍ॅलन लेव्ही यांनी आपल्या निवेदनात स्पष्ट केले आहे.


न्यूज जीपीटीचे कोणतेही वार्ताहर नाही (No Reporters, No Fake News) आणि कोणताही पक्षपात नसल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. न्यूज जीपीटी  जगभरातील वाचकांना निःपक्षपाती आणि तथ्यावर आधारित बातम्या प्रदान करण्याचा दावा करत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. तसेच न्यूज जीपीटी newsgpt.ai वर मोफत उपलब्ध असल्याची माहितीही त्यांनी दिली.


न्यूज जीपीटीच्या माध्यमातून सुरू करण्यात येणारे चॅनेल हे कोणत्याही प्रकाराने बाधित होणार नाही. मशीन लर्निंग अल्गोरिदम आणि नैसर्गिक भाषा प्रक्रिया तंत्रज्ञानाद्वारे ते बातम्यांवर प्रक्रिया करणार आहे. त्यामुळे न्यूज जीपीटी जगभरातील संबंधित बातम्यांचे स्रोत रिअल टाइममध्ये स्कॅन करण्यास सक्षम आहे. नंतर अचूक, अद्ययावत आणि निःपक्षपाती असलेल्या बातम्या तयार करण्यासाठी या डेटाचा वापर करणार असल्याची माहिती अ‍ॅलन लेव्ही यांनी दिली. न्यूज जीपीटीचे एआय अल्गोरिदम सोशल मीडिया, न्यूज वेबसाइट्स आणि सरकारी एजन्सीसह विस्तृत स्त्रोतांकडील डेटाचे विश्लेषण करण्यास सक्षम असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.


हे चॅनेल प्रेक्षकांना राजकारण आणि अर्थशास्त्रापासून विज्ञान आणि तंत्रज्ञानापर्यंत विविध विषयांवर ताज्या बातम्या आणि माहिती प्रदान करणार आहे. इतर न्यूज चॅनेलच्या विपरीत न्यूज जीपीटीवरील बातम्या जाहिरातदार, राजकीय संलग्नता किंवा वैयक्तिक मतांनी प्रभावित होत नसल्याचे कंपनीच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.


चॅट जीपीटीच्या न्यूज जीपीटी या वाहिनीवर आठवड्यातील चोवीस तास बातम्या पुरवण्यात येणार आहेत. या बातम्या अचूक आणि विश्वासार्ह पुरवण्यावर कंपनीचे लक्ष असल्याचे अ‍ॅलन लेव्ही यांनी स्पष्ट केले. प्रत्येकजण निःपक्षपाती आणि तथ्यावर आधारित असलेल्या बातम्या पाहण्यासाठी न्यूज जीपीटी या वाहिनीवर त्या पाहू शकत असल्याचेही कंपनीच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे. मायक्रोसॉफ्टच्या मालकीच्या ओपनएआयने फोटो आणि मजकूर इनपूट स्वीकारणारे त्याचे नवीन मोठे मल्टीमॉडेल जीपीटी-४ घोषित केल्यानंतर ही बातमी पुढे आल्याने प्रसार माध्यमातील पेडन्यूजची दुकानदारी चालवणा-या सर्वांचेच धाबे दणाणले आहेत.

Comments
Add Comment

पंतप्रधान आणि चीनचे अध्यक्ष यांच्या चर्चेत काय ठरले ?

तिआनजिन : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांची शांघाय कॉऑपरेटिव्ह ऑर्गनायझेशनच्या शिखर

युक्रेनच्या माजी संसद सभापतींची गोळ्या घालून हत्या

ल्विव्ह: पश्चिम युक्रेनमध्ये एका प्रमुख युक्रेनियन राजकारणी आणि माजी संसद सभापतींची अज्ञात हल्लेखोरांकडून

मोठी बातमी! इस्रायलने केलेल्या एअर स्ट्राईकमध्ये हुथी पंतप्रधान अहमद अल-राहवी यांचा मृत्यू

येमेनमधील सना येथे इस्रायलने केलेल्या हवाई हल्ल्यात हुथी पंतप्रधानासह अनेक प्रमुख नेत्यांचा मृत्यू  सना:

Trump is Dead सोशल मीडियावर होतंय प्रचंड ट्रेंड!

वॉशिंग्टन डीसी: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ बॉम्बने जगातील अनेक देशातील आर्थिक

पंतप्रधान मोदी सात वर्षांनंतर चीन दौऱ्यावर, जिनपिंग आणि पुतिनना भेटणार

तियानजिन : जपानच्या दौऱ्यानंतर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी चीनच्या दौऱ्यावर आहेत. ते विशेष विमानाने

५०० हून अधिक ड्रोन आणि ४५ क्षेपणास्त्रांचा मारा... रशियाचा युक्रेनवर मोठा हल्ला,

कीव: रशियाने युक्रेनचा सर्वात मोठा ड्रोन हल्ला उधळून लावत त्याच्या प्रत्युत्तरादाखल युक्रेनवर ड्रोन हल्ले