Wednesday, April 15, 2026

व्हायरल व्हिडिओ प्रकरणी प्रकाश सुर्वे म्हणाले, शीतल म्हात्रे माझ्या...

व्हायरल व्हिडिओ प्रकरणी प्रकाश सुर्वे म्हणाले, शीतल म्हात्रे माझ्या...

मुंबई : दहिसरचे आमदार प्रकाश सुर्वे आणि शिवसेना प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांच्या मॉर्फ्ड व्हिडिओ प्रकरणावर प्रकाश सुर्वे यांनी मौन सो़डलं आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर शीतल म्हात्रे तसेच प्रकाश सुर्वे यांनी दहिसर पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यानंतर पाच जणांना अटकही झाली. या दरम्यान शीतल म्हात्रे या वेळोवेळी प्रसार माध्यमांशी संवाद साधत संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करत होत्या. पण, इतक्या दिवसांनंतर प्रकाश सुर्वे प्रथमच माध्यमांसमोर आले आहेत.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आशिर्वाद यात्रे निमित्त काढण्यात आलेल्या रॅलीतील शीतल म्हात्रे आणि प्रकाश सुर्वे यांच्या मॉर्फ्ड व्हिडिओवर इतके दिवस प्रकाश सुर्वे यांनी मौन का धारण केले यावर चर्चेला उधाण आले होते. या चर्चेला पुर्णविराम देत प्रकाश सुर्वे यांनी माध्यमांना पत्र लिहिलं आहे. या पत्रातून त्यांनी हा व्हिडीओ चुकीचा असल्याचं म्हटलं आहे. हा व्हिडीओ मॉर्फ करून कुणी तरी त्यात गाणं अपलोड करून विकृतपणा केल्याचं सुर्वे यांनी म्हटलं आहे. तसेच शीतल म्हात्रे आपल्याला बहिणीसारख्या आहेत, असं सांगतानाच विरोधकांना नैराश्य आलं आहे. माझ्या मतदारसंघात सुरू असलेली विकासकामे त्यांना पाहवत नाहीत. त्यामुळेच हा विकृतपणा करण्यात आल्याचा दावा त्यांनी केला आहे.

Comments
Add Comment