मुंबई (प्रतिनिधी) : बाळकृष्ण इंडस्ट्रीज लिमिटेडने (बीकेटी) पाच वेळा चॅम्पियन असलेल्या मुंबई इंडियन्ससोबत आगामी टी-२० क्रिकेट लीग २०२३ मध्ये ‘ऑफिशियल टायर पार्टनर’ म्हणून आपली भागीदारी वाढवली. या वर्षी बीकेटी आणि मुंबई इंडियन्स यांच्यातील सहकार्याचा चौथा हंगाम आहे. बहुप्रतीक्षित टी-२० क्रिकेट लीग २०२३, ३१ मार्च २०२३ रोजी सुरू होईल.
बाळकृष्ण इंडस्ट्रीजचे सहव्यवस्थापकीय संचालक राजीव पोद्दार म्हणाले, “मुंबई इंडियन्ससोबत सलग चौथ्या वर्षी भागीदारी करताना आम्हाला आनंद होत आहे. मुंबई इंडियन्स फ्रँचायझी केवळ सर्वात सातत्यपूर्ण संघांपैकी एक नाही, तर ते देखील मजबूत नेतृत्वगुण, शिस्त, कठोर परिश्रम आणि लवचिकता या मूलभूत मूल्यांचे प्रदर्शन करत आहेत. जे आमच्या नैतिकतेशी पूर्णपणे जुळतात. मैदानावरील त्यांची विजयाची भावना खरोखर प्रेरणादायी आहे आणि आमच्या ब्रँडच्या कथा जागतिक स्तरावर शेअर करण्यासाठी त्यांच्यासोबत मोहीम राबविण्याचा आम्हाला सन्मान वाटतो. आम्ही मुंबई इंडियन्ससोबत हा प्रवास सुरू ठेवण्यास आणि त्यांच्या क्रिकेट विषयक क्रीडाभावनेला प्रोत्साहन देण्यासाठी उत्सुक आहोत.
मुंबई इंडियन्सचे प्रवक्ते म्हणाले की, “बीकेटी सोबत मैदानावर आणि मैदानाबाहेर एक मजबूत कार्यरत भागीदारी निर्माण करताना आम्हाला खरोखर आनंद होत आहे.
चेन्नई: इंडियन प्रीमियर लीग २०२५च्या ४३व्या सामन्यात आज सनरायजर्स हैदराबादने चेन्नई सुपर किंग्सला ५ विकेट्स…
पंचांग आज मिती चैत्र कृष्ण त्रयोदशी ८.३० पर्यंत नंतर चतुर्दशी शके १९४७. चंद्र नक्षत्र उत्तराभाद्रपदा…
पावसाळा आता जेमतेम सव्वा महिन्यावर आलेला आहे. पावसाळी हंगामास दरवर्षी कागदोपत्री १ जूनला सुरुवात होत…
मराठवाडा वार्तापत्र: अभयकुमार दांडगे उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत आहे. त्याच तुलनेत मराठवाड्यात तहानलेल्या गावांच्या संख्येतही…
रवींद्र तांबे ग्रामीण भागाचा विचार करता अजूनही पुरेशा मूलभूत सोयी नसल्याने नागरिक मुलांना घेऊन शहराकडे…
मुंबई: पहलगाम येथे नुकत्याच झालेल्या दुर्घटनेनंतर जखमी व त्यांच्या कुटुंबियांसाठी मुंबई महानगरपालिकेच्या टोपीवाला नॅशनल मेडिकल…