नवी दिल्ली : देशात व्हायरल फ्लूच्या रुग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. इन्फ्लुएंझामुळे (H3N2 Influenza) रुग्णालयात भरती होणाऱ्या रुग्णांची संख्या देखील वाढताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर आरोग्य तज्ज्ञांकडून फ्लू वॅक्सिन घेण्याचे आवाहन केले जात आहे. दिल्ली एम्सचे माजी संचालक डॉ. रणदीप गुलेरिया (Randeep Guleria) यांनी नागरिकांना घाबरुन न जाता योग्य काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे. डॉ. रणदिप गुलेरिया यांनी इन्फ्लुएंझापासून बचाव करण्यासाठी कोविड उपायांचा अबलंब करण्यास सांगितले आहे. यावेळी मास्क, लस आणि सॅनिटायझेशन ही त्रिसूत्री वापरण्याचा सल्ला त्यांनी दिला आहे.
इन्फ्लुएंझा हा व्हायरल फ्लू असून हा विषाणू H1N1 विषाणूचं म्युटेशन म्हणजे बदलेला प्रकार आहे. व्हायरल H3N2 इन्फ्लूएंझामुळे देशात आतापर्यंत दोन जणांचा मृत्यू झाला आहे. कर्नाटक आणि हरियाणामध्ये प्रत्येकी एका मृत्यूची नोंद झाली आहे. डॉ. रणदीप गुलेरिया यांनी राष्ट्रीय कोविड टास्क फोर्सचे नेतृत्व केले. त्यांनी सांगितलं की, नागरिक कोविड उपायांचं पालन करु आणि लसीकरण करु शकतात. नागपूर येथे अकादमी ऑफ मेडिकल सायन्सेस (एएमएस) तर्फे आयोजित परिषदेत डॉ.रणदीप गुलेरिया यांनी ही माहिती दिली आहे.
डॉ. गुलेरिया म्हणाले की, मास्क वापरण्याची गरज आहे, कोविडप्रमाणे पसरणारा संसर्ग आहे. हा संसर्ग खोकल्याद्वारे पसरतो. म्हणूनच आपण मास्क वापरावा, हात नियमित धुवावेत आणि सामाजिक अंतर पाळलं पाहिजे. मधुमेह तसेच गंभीर आजाराच्या रुग्णांनी जास्त काळजी घेणं आवश्यक आहे, कारण त्यांना संसर्गाचा धोका जास्त आहे.
डॉ. गुलेरिया म्हणाले की, दुसरा पर्याय म्हणजे उच्च जोखीम असणाऱ्या रुग्णांना वेगळं ठेवणं. वृद्ध आणि इतर आजारी लोकांना वेगळं ठेवून त्यांच्यावर उपचार आणि त्यांचं निरीक्षण करणे गरजेचं आहे. तसेच फ्लूवरील लस घेणं हा एक उपाय आहे. इन्फ्लूएंझा जॅब दरवर्षी नवीन लसीच्या स्वरुपात येतो आणि या लसीमध्ये इन्फ्लूएंझा ए आणि बी आणि त्यांचे उपप्रकार देखील समाविष्ट आहेत.
पुणे : विद्येचे माहेरघर आणि सांस्कृतिक राजधानी नंतर क्राइम शहर म्हणून ओळखले जाणाऱ्या पुणे शहरात…
मुंबई : उन्हाळ्याचा प्रभाव खुपच वाढत आहे.उन्हाळ्यात बहुतेक लोक शरीर थंड ठेवण्यासाठी दही खातात. पण…
हैदराबाद : दाक्षिणात्य अभिनेता महेश बाबू (Mahesh Babu) यांना रिअल इस्टेट (Real Estate Groups) गुंतवणूकदारांच्या…
वादळ, हिमनद्या वितळणे, अवकाळी पावसासारख्या वाढल्या आपत्तीच्या घटना ठाणे (प्रशांत सिनकर) : जगभरात २२ एप्रिल…
ऑर्लँडो : अमेरिकेतील ऑर्लँडो आंतरराष्ट्रीय विमानतळावर (Orlando International Airport) डेल्टा एअरलाइन्सच्या विमानाला आग लागली. मात्र,…
मुंबई: यंदाच्या वर्षी ३० एप्रिलला अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त आहे. या दिवशी कोणतेही शुभ कार्य केले…