मुश्रीफांच्या घरावर छापेमारी सुरु असताना एका ज्वेलर्सवरही धाड

छत्रपती संभाजी नगर: ईडी कडून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हसन मुश्रीफ यांच्या घरी छापेमारी सुरु असताना छत्रपती संभाजीनगर शहरातील एका सराफा दुकानावर जीएसटीच्या वसुली पथकाने छापा घातला आहे. काल दुपारी सुरु झालेली छापेमारीची कारवाई अजूनही सुरुच असल्याने शहरात खळबळ उडाली आहे.


बाफना ज्वेलर्स या शहरातील एका सराफा दुकानावर जीएसटीच्या वसुली पथकाने छापा घातला. काल दुपारी एक वाजेपासून रात्री उशिरापर्यंत कर विभागाचे पथक दुकानात तपास करीत होते. दुकानातील कर्मचाऱ्यांना या वेळेत दुकानातच थांबवून ठेवण्यात आले होते. तर आज दुसऱ्या दिवशीही कारवाई सुरूच आहे.


कर चोरीप्रकरणी जीएसटीच्या वसुली पथकाने ही छापेमारी केल्याच समजत आहे. तर कारवाईसाठी आलेल्या पथकाने सुरुवातीला दुकानातील सर्व फोन बंद करून, त्यानंतर चौकशी सुरु केली. तसेच या पथकाने दुकानातील ज्वेलरी खरेदी-विक्री संबधित कागदपत्रे तपासली आहे. सोबतच वेगवेगळ्या बिलांची तपासणी करण्यात येत असून भरलेल्या जीएसटीबाबत चौकशी केली जात आहे. तर संबधित ज्वेलर्सने कर चोरल्याचा जीएसटी पथकाला संशय असून, त्यानुसार चौकशी केली जात असल्याची माहिती देखील मिळाली आहे. तर या कारवाईबाबत जीएसटी विभागाकडून अजूनही कोणतेही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.

Comments
Add Comment

Pune: नर्सिंगच्या १९ वर्षीय विद्यार्थिनीने जीवनयात्रा संपवली; सुसाईड नोटमुळे संशय

पुणे: पुण्यातून काळीज पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. एका १९ वर्षीय नर्सिंग विद्यार्थीनीला तिच्या

केमिकल इंडस्ट्रीच्या प्रगतीसाठी महाराष्ट्र शासन कटीबद्ध

मुंबई: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज '१९व्या ॲन्युअल इंडिया केमिकल इंडस्ट्री आऊटलुक कॉन्फरन्स अँड

नवजात बालकांची विक्री रोखण्यासाठी महाराष्ट्र सरकार करणार कठोर कायदा; गृहराज्यमंत्री योगेश कदम यांची विधानपरिषदेत घोषणा

मुंबई: मुंबई शहर आणि उपनगरातील दाट लोकवस्तीच्या भागांमध्ये नवजात बालकांची विक्री करणाऱ्या टोळ्या मोठ्या

गिग वर्कर्सच्या गुन्ह्यांना बसणार लगाम; पोलीस पडताळणी आणि सेंट्रल पोर्टलवर नोंदणी आता बंधनकारक

मुंबई: राज्यातील खाद्यपदार्थ आणि विविध वस्तू घरपोच देणाऱ्या 'गिग' वर्कर्सच्या (Gig Workers) माध्यमातून घडणाऱ्या

दुसऱ्या टप्प्यात जातीनिहाय जनगणना होणार; मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी केला संभ्रम दूर

मुंबई: एप्रिलपासून सुरु होत असलेली जनगणना पहिल्या टप्प्यातील असून यामध्ये केवळ घरगणना होत आहे. त्यामुळे

नागपूर नवीन विधानभवनचे काम विहित कालावधीत पूर्ण करणार, मुख्यमंत्र्यांनी दिली माहिती

मुंबई: नागपूर नवीन विधानभवनचे काम २०२८ पर्यंत पूर्ण करण्यात यावे. विधानसभा आणि विधान परिषदेचे सभागृह, मध्यवर्ती