बुमराहच्या पाठीची शस्त्रक्रिया न्यूझीलंडमध्ये यशस्वी

  124

वेलिंग्टन (वृत्तसंस्था) : गेल्या काही महिन्यांपासून दुखापतीमुळे त्रस्त असलेला भारताचा भरवशाचा गोलंदाज जसप्रीत बुमराहच्या पाठीची शस्त्रक्रिया न्यूझीलंडमध्ये यशस्वी झाली. दरम्यान बुमराहला मैदानात परतण्यासाठी किमान ६ महिन्यांची कालावधी लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.


जिथे इंग्लंडचा स्टार वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरवर उपचार करण्यात आले. त्याच डॉक्टरांनी बुमराहची न्यूझीलंडमध्ये शस्त्रक्रिया केली आहे. तसेच, याच डॉक्टरांकडे न्यूझीलंडचा दिग्गज वेगवान गोलंदाज शेन बाँडनेही उपचार घेतले होते.


पाठीच्या समस्येमुळे जसप्रीत बुमराह आधीच आयपीएल २०२३ मधून बाहेर पडला आहे. पण याच वर्षी होणाऱ्या विश्वचषकात मात्र जसप्रीत बुमराह खेळण्याची शक्यता असल्याचे बोलले जात आहे.
बुमराहला संपूर्णपणे बरे होण्यासाठी आणखी काही दिवसांच्या विश्रांतीची आवश्यक असेल. बुमराहची रिकव्हरी झाल्यानंतर रिहॅबिलिटेशन सुरू होणार आहे. ज्यामध्ये तीन ते ५ महिन्यांचा वेळ लागू शकतो.

Comments
Add Comment

आर. प्रज्ञानंद फिडे क्लासिकल बुद्धिबळ क्रमवारीत चौथ्या स्थानी

मुंबई  : सिंकफिल्ड बुद्धिबळ करंडकात दुसरे स्थान मिळवलेल्या भारताच्या आर. प्रज्ञानंद याने फिडे क्लासिकल

रोहित शर्माने घटविले तब्बल २० किलो वजन

मुंबई : रोहित शर्माने आंतरराष्ट्रीय टी२० आणि कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असून, वनडे क्रिकेटमध्ये सक्रिय

टी-२० वर्ल्डकपआधी ऑस्ट्रेलियाच्या मिचेल स्टार्कने अचानक केली निवृत्तीची घोषणा

मुंबई: ऑस्ट्रेलियाचा डावखुरा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कने आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटला रामराम ठोकला आहे.

"१८ वर्षापूर्वीचं का उकरून काढलं?" थप्पड कांड व्हिडिओ लिकने भज्जी संतापला

नवी दिल्ली: ललित मोदी यांनी मायकेल क्लास यांच्यासोबत एका पॉडकास्टमध्ये आयपीएल २००८ च्या हंगामात गाजलेल्या

महिला वर्ल्ड कप खेळणारे संघ होणार करोडपती

दुबई : भारतात ३० सप्टेंबरपासून महिला वनडे विश्वचषक सुरु होत आहे. आयसीसीने या स्पर्धेसाठी बक्षीस रकमेची घोषणा

Asia Cup 2025 : भारताचा सलग दुसऱ्या विजयासह सुपर-४ मध्ये प्रवेश; जपानवर मात

पाटणा : भारतीय संघाने आशिया कप हॉकी स्पर्धेच्या सुपर-४ मध्ये दिमाखात प्रवेश केला आहे. रंगतदार लढतीत भारतीय