आर. प्रज्ञानंद फिडे क्लासिकल बुद्धिबळ क्रमवारीत चौथ्या स्थानी

मुंबई  : सिंकफिल्ड बुद्धिबळ करंडकात दुसरे स्थान मिळवलेल्या भारताच्या आर. प्रज्ञानंद याने फिडे क्लासिकल बुद्धिबळ क्रमवारीत चौथ्या स्थानी झेप घेतली आहे. आर. प्रज्ञानंद याला २७८५ एलो रेटिंगची कमाई करता आलेली आहे. नॉर्वेचा मॅग्नस कार्लसन हा २८३९ रेटिंगसह पहिल्या स्थानावर कायम आहे. मॅग्नस कार्लसन हा विश्व अजिंक्यपद स्पर्धेमध्ये सहभागी होत नाही. तसेच डी. गुकेश हा वर्तमान विश्वविजेता आहे. तरीही मॅग्नस कार्लसन हा क्लासिकल प्रकारात रेटिंगच्या जोरावर पहिल्या स्थानावर विराजमान आहे. त्यानंतर दोन स्थानांवर अमेरिकन खेळाडूंचे वर्चस्व प्रकर्षाने दिसून येत आहे. हिकारु नाकामुरा हा २८०७ रेटिंगसह दुसऱ्या स्थानावर असून, फॅबियानो कारुआना २७८९ रेटिंगसह तिसऱ्या स्थानावर आहे. भारताच्या तीन पुरुष खेळाडूंचा फिडे क्लासिकल अव्वल १० क्रमवारीत समावेश आहे. आर. प्रज्ञानंद चौथ्या स्थानावर आहे. तसेच अर्जुन एरीगेसी २७७१ रेटिंगसह पाचव्या स्थानावर आहे. शिवाय डी. गुकेश २७६७ रेटिंगसह सहाव्या स्थानावर आहे. महिलांच्या अव्वल २० खेळाडूंच्या क्रमवारीत कोनेरू हंपी, दिव्या देशमुख व द्रोणावल्ली हरिका या भारतीय खेळाडूंचा समावेश आहे. कोनेरू हंपी पाचव्या स्थानावर आहे. विश्वविजेती दिव्या देशमुख १४व्या स्थानावर आहे. तसेच द्रोणावल्ली हरिका १९व्या स्थानावर आहे.

पुरुष विभागातील सर्वोत्तम सहा खेळाडू


१) मॅग्नस कार्लसन (नॉर्वे) - २८३९ रेटिंग
२) हिकारू नाकामुरा (अमेरिका) - २८०७ रेटिंग
३) फॅबियानो कारुआना (अमेरिका) - २७८९ रेटिंग
४) आर. प्रज्ञानंद (भारत) - २७८५ रेटिंग
५) अर्जुन एरीगेसी (भारत) - २७७१ रेटिंग
६) डी. गुकेश (भारत) - २७६७ रेटिंग

महिला विभागातील सर्वोत्तम सहा खेळाडू


१) होऊ यिफान (चीन) - २६०९ रेटिंग
२) जू वेनजुन (चीन) - २५७० रेटिंग
३) लेई टिंगजी (चीन) - २५६५ रेटिंग
४) झू जिनर (चीन) - २५४८ रेटिंग
५) कोनेरू हंपी (भारत) - २५३५ रेटिंग
६) मुझीचूक ॲना (युक्रेन) - २५३५ रेटिंग
Comments
Add Comment

ENG vs PAK Test Match : लॉर्ड्सवर पाकिस्तानचा ‘काळा दिवस’; १९४ धावांत ऑलआऊट, WTC फायनलच्या शर्यतीतून बाहेर!

लॉर्ड्स : इंग्लंडविरुद्धच्या लॉर्ड्स कसोटीत पाकिस्तानला दारुण पराभवाचा सामना करावा लागला आहे. ३८९ धावांच्या

Kagiso Rabada : कागिसो रबाडा ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या कसोटी मालिकेला मुकण्याची शक्यता

नवी दिल्ली : ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या कसोटी मालिकेच्या सुरुवातीपूर्वी दक्षिण आफ्रिकेला मोठा धक्का बसला आहे.

Roger Federer : रॉजर फेडररचा 'टेनिस हॉल ऑफ फेम'मध्ये समावेश

नवी दिल्ली : ऱ्होड आयलंडमधील न्यूपोर्ट येथे 'इंटरनॅशनल टेनिस हॉल ऑफ फेम'मध्ये समावेश होताना २० वेळा ग्रँडस्लॅम

Dwayne Bravo No. 47 retired : ट्रिनबागो नाइट रायडर्सकडून ड्वेन ब्राव्होची ४७ क्रमांकाची जर्सी निवृत्त

नवी दिल्ली : ट्रिनबागो नाइट रायडर्स (टीकेआर) संघाने ड्वेन ब्राव्होची प्रतिष्ठित ४७ क्रमांकाची जर्सी निवृत्त

Namibia T20I Tri-Series : दक्षिण आफ्रिकेचा झिम्बाब्वेवर सात गडी राखून दणदणीत विजय

नवी दिल्ली : झिम्बाब्वेला सात गडी राखून पराभूत करून दक्षिण आफ्रिकेने तिरंगी मालिकेत आपले आव्हान कायम ठेवले आहे.

Asian Games 2026 : दुखापतीमुळे नीरजची माघार; यश वीरला मिळणार संधी ?

नवी दिल्ली : आगामी आशियाई क्रीडा स्पर्धेत पुरुषांच्या भालाफेक प्रकारात भारताच्या सुवर्णपदकाच्या आशांना मोठा