डोंबिवली (वार्ताहर) : जगप्रसिद्ध झालेला खेळ कल्याण डोंबिवलीकरांना देखील खेळता यावा आणि येणाऱ्या ऑलिम्पिकमध्ये इथला खेळाडू असावा या उद्देशाने डावखर फाउंडेशन आणि रिजन्सी ग्रुप यांनी बेलग्रेव स्टेडियम सुरू केले आहे. ज्यामध्ये आठ कोर्ट, चार पॅवेलिअन्स असणार आहेत. या स्टेडियमचे उद्घाटन सुप्रसिद्ध अभिनेते भाऊ कदम यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी रीजन्सी ग्रुपचे महेश अग्रवाल, संजय गोयल, अनिल भतीजा, विकी रुपचंदाणी, दिनेश कुमार बासोरिया उपस्थित होते. तसेच माजी उपमहापौर मोरेश्वर भोईर आणि माजी नगरसेवक सचिन पोटे देखील उपस्थित होते.
आजची जीवनशैली पाहता निरोगी राहण्यासाठी आणि चपळता वाढवण्यासाठी पिकल बॉल हा खेळ आवर्जून खेळला जातो. उद्घाटनाच्या दिवशी डावखर कप २०२३ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश, गुजरात, राजस्थान, बिहार, दिल्ली, झारखंडमधून खेळाडू स्पर्धेत सहभागी झाले होते. डावखर कप २०२३ मधील विजेत्यांना रोख रक्कम आणि मेडल देऊन गौरविण्यात आले. ओपन मेन्स सिंगलमध्ये अनुक्रमे कुलदीप महाजन, गौरव राणे, हिमांश मेहता, ओपन मेन्स डबलमध्ये अनुक्रमे तेजस मयूर, वंशिक रोनव, गौरव हिमांश आणि ३५ प्लस मेन्स डबलमध्ये अनुक्रमे मिहीर हिमांशू, वैभव विकी, संदीप शैलेश यांनी प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक पटकावला. यावेळी राष्ट्रीय टेनिस खेळाडू ईशा लखानी आणि नॅशनल पिकल बॉल खेळाडू नैमी मेहता व हर्ष मेहता देखील उपस्थित होते. तसेच ऑल इंडिया पिकल बॉल असोसिएशन अध्यक्ष अरविंद प्रभू हे देखील खेळाडूंना प्रोत्साहित करण्यासाठी आले होते.
भारतात या खेळाची आवड निर्माण व्हावी त्यामुळे अल्पदरात प्रवेश असेल आणि सुरुवातीचे काही दिवस मोफत प्रवेश दिला जाणार आहे. प्रत्येक वयोगटात खेळला जाणारा हा खेळ असून प्रत्येक वयोगटातील बेस्ट प्लेयरच्या युएस चॅम्पियनशिपचा पूर्ण खर्च डावखर फाउंडेशन उचलणार आहे अशी माहिती डावखर फाउंडेशनचे संतोष डावखर यांनी दिली. एशियातल्या सर्वात मोठ्या पिकल बॉल स्टेडियम उद्घाटनाचे सूत्रसंचालन कलाकार प्रणव भांबुरे यांनी केले.
मुंबई : कुलाबा-वांद्रे-सीप्झ मेट्रो ३ (Metro 3) मार्गिकेवर आरे ते बीकेसी दरम्यान धावणाऱ्या या गाड्यांच्या…
मुंबई : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या नेतृत्वातील शिवसेना या पक्षाविषयी केलेल्या वक्तव्यांप्रकरणी कॉमेडिअन…
पर्यायी मार्गाची व्यवस्था केल्याचे वाहतूक पोलीसांची माहिती मुंबई : मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावरील परळ…
पहलगाम : जम्मू काश्मीरमधील पहलगाममध्ये अतिरेक्यांनी २६ पर्यटकांची हत्या केली. हा अतिरेकी हल्ला करण्यासाठी सशस्त्र…
बांदीपोरा : जम्मू काश्मीरमध्ये अतिरेक्यांनी २६ पर्यटकांची हत्या केली. या घटनेनंतर भारताच्या सुरक्षा पथकांनी जम्मू…
उधमपूर : जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या अतिरेकी हल्ल्यानंतर उधमपूरमध्ये सुरक्षा पथक आणि अतिरेकी यांच्यात…