१. लवंगी मिरची मालिकेबद्दल काय सांगशील?
ही नवीन मालिका एक वेगळ्या कथेसह आली आहे, त्यात मध्ये बोलली जाणारी भाषा कोल्हापुरी आहे. या मालिकेचं शीर्षक ज्या मुलीला दिले गेले आहे, त्या मुलीच्या आईची भूमिका मी साकारत आहे. जशी लवंगी मिरची खूप तिखट असते तसेच माझ्या मुलीचे पात्र करणारी अस्मी देखील खूप तिखट आहे. या मालिकेमध्ये एक डायलॉग आहे, ‘समोरचा जेवढा खट, अस्मी तेवढीच तिखट.’ एकूणच मालिकेतील वातावरण गावाकडचे आहे, म्हणजे जगण्याची पद्धत दाखवली आहे. तर अशी ही मालिका आहे आणि मला खात्री आहे प्रेक्षकांना सुद्धा ही मालिका खूप आवडेल.
२. तुझ्या भूमिकेबद्दल काय सांगशील?
या मालिकेत मी अस्मिच्या आईची भूमिका साकारताना दिसणार आहे. आतापर्यंत तुम्ही बघितल असेल की तिची आई स्वभावाने अतिशय निरागस, मितभाषी आणि खूप साधी आहे, ती खूप प्रेमळ आहे. सर्वांबरोबर प्रेमाने वागते, तिने स्वतःची एक खानावळ सुद्धा उभी केली आहे. तिच्या आधीच्या प्रवासात तिला खूप अडथळे आले, तिला तीन मुली आहेत तरीही तिने एकटीने स्वकर्तृत्वावर खानावळ उभी केली. ती निरागस असल्यामुळे लोक तिचा गैरफायदा घेऊ शकतात, तिला काहीही बोलू शकतात, पण अस्मी असल्यामुळे तिच्या आईला आणि तिच्या दोन बहिणींना काही काळजी नाही कारण त्यांना माहित आहे की घरात कोणीतरी आहे जो त्यांचे
रक्षण करेल.
३. तुझ्या सहकलाकारांबद्दल काय सांगशील ?
खरं सांगायचं तर खूप छान वाटतंय. या मालिकेची माझी टीम / सहकलाकार ज्यांच्या बरोबर मी काम करतेय, आमची एक छान ट्युनिंग झाली आहे. त्यामुळे काम करायला खूप मज्जा येते. आम्ही खूप धम्माल करतो. एक वेगळी भाषा बोलायला मिळतेय त्यामुळे तर लय
भारी वाटते.
४. तुझ्या वैयक्तिक अनुभवाबद्दल सांग / आता पर्यंतचा प्रवास?
मी या आधी सुद्धा झी मराठी बरोबर मालिकेत काम केलय. तयामुळे पुन्हा झी मराठीसोबत काम करताना खूप आनंद होतोय, आणि मला अभिनयाची खूप आवड आहे. मी नेहमी माझ्या कामाचा आनंद घेते, आणि त्यात देखील झी मराठी सारखी वाहिनी ही खूपचं वेगळी भावना आहे.
पुणे: जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम (Pahalgam Terror Attack) येथे दहशतवाद्यांकडून झालेल्या भ्याड हल्ल्यात मराठी अभिनेता…
चकमकीत दोन अतिरेकी ठार, १० किलो IED आणि शस्त्रसाठा जप्त बारामुल्ला : जम्मू काश्मीर येथे…
दरभंगा : जम्मू काश्मीरमधील पहलगाममध्ये झालेल्या अतिरेकी हल्ल्याला भारताकडून कशी प्रतिक्रिया दिली जाणार यावरुन तर्कवितर्कांना…
मुंबई : तब्बल १० कोटी रुपयांच्या बनावट 'लेटर ऑफ क्रेडिट' (LC) प्रकरणात सीबीआय न्यायालयाने तीन…
मुंबई: मंगळवारी दि २२ एप्रिल रोजी जम्मू - काश्मीरमधील पहलगाम (Pahalgam Terror Attack) येथील पर्यटकांच्या…
वरळी BMW अपघात प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केली हळहळ मुंबई : काही अपघात हे केवळ…