कल्याण : सम्राट अशोक विद्यालयात दहावीच्या परीक्षेच्या पहिल्या दिवशी संस्थेचे अध्यक्ष पी. टी. धनविजय यांच्यासह परीक्षा केंद्र संचालक गुलाबराव पाटील, प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका सुजाता नलावडे आणि माध्यमिक विभागाच्या शिक्षकांनी, परीक्षार्थी विद्यार्थी व पालकांचे शाळेच्या प्रवेश द्वाराजवळ गुलाब पुष्प देत स्वागत केले.
विद्यार्थी वर्षभर अभ्यास करतात आणि ऐन परीक्षेच्या वेळी मनात भीती निर्माण होते. आपल्या मुलाला पेपर कसा जाईल याचा तणाव पालकांनाही असतो. परीक्षा केंद्रावर मुलांना घेऊन आलेल्या पालकांचे अनपेक्षित पणे स्वागत झाल्याने पालकांच्या चेहऱ्यावर आनंद जाणवत होता. परीक्षा केंद्रावर आल्यावर थोडे दडपण वाटत होते. परंतु गुलाबराव पाटील सर यांच्या शुभेच्छा आणि परीक्षा केंद्रावरील काढलेले रांगोळी, झेंडूच्या पाकळ्यांची सजावट आणि गुलाब पुष्प देऊन केलेले स्वागत या वातावरणाने मी भारावून गेली आणि मनावरील दडपण दूर झाले असल्याची प्रतिक्रिया सुषमा कुंभलकर या पालकांनी दिली.
विशेष म्हणजे परीक्षा झाल्यावर पहिला पेपर चांगला गेला. अशी उत्स्फूर्त प्रतिक्रिया विद्यार्थ्यांनी शिक्षकांकडे व्यक्त केली.
मुंबई: इंडियन प्रीमियर लीग २०२५च्या ४०व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने लखनऊ सुपर जायंट्सवर ८ विकेट्सनी विजय…
मुंबई : महाराष्ट्रात पहिली ते पाचवीपर्यंत इंग्रजीबरोबर हिंदी भाषाही सक्तीची करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयावर टीकेची…
मुंबई: जम्मू-काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाम येथे आज, मंगळवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सुमारे २७ जणांचा मृत्यू…
मुंबई : ग्रामीण असो किंवा शहरी भाग, लोकांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागू नये. उन्हाळा…
इंडिया कॉलिंग : डॉ. सुकृत खांडेकर महाराष्ट्रात यापुढे पहिलीपासून हिंदी भाषा शिकवणे अनिवार्य होणार आहे.…
श्रीनगर : जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी पर्यटक आणि स्थानिकांवर अंदाधुंद गोळीबार केला. या गोळीबारात २७ व्यक्तींचा…