
रामदास आठवलेंच्या आरपीआयचा नागालँडमध्ये दोन जागांवर विजय
कोहिमा : नागालँडमधील दोन जागांवर रामदास आठवलेंच्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (आरपीआय) दोन आमदार निवडून आले आहेत. पहिल्यांदाच राज्याबाहेर रामदास आठवले यांच्या आरपीआयचे आमदार निवडून आले आहेत.
आरपीआय पक्षाच्या (आठवले) वाय. लिमा ओनेन चँग यांनी नागालँडमधील नोक्सेन जागेवर विजय मिळवला आहे. तर इम्तीचोबा यांनी तुएनसांग सदर-२ येथील जागा जिंकली आहे.
पुणे पोटनिवडणुकीसोबतच देशातील तीन राज्यांच्या विधानसभा आणि पाच राज्यातील पोट निवडणुकांचे निकाल आज जाहीर होत आहेत. काही जागांचे निकाल हाती आले आहेत, तर काही ठिकाणी अद्याप मतमोजणी सुरु आहे.