ठाणे: अनंत करमुसे मारहाण प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्या अडचणीत आणखी भर पडण्याची शक्यता आहे. या मारहाण प्रकरणाचा पुन्हा तपास करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत.
अनंत करमुसे प्रकरणात राज्य सरकारच्या तपास यंत्रणांना पुढील तपास करण्याचे आदेश देण्यात आले आहेत, तसेच याचा अहवाल तीन महिन्यात सादर करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाकडून देण्यात आले आहेत. जितेंद्र आव्हाड यांचे सुरक्षारक्षक आणि काही कार्यकर्त्यांनी अनंत करमुसे यांना जितेंद्र आव्हाड यांच्या निवासस्थानी घेऊन जात मारहाण केल्याचा आरोप आहे.
या मारहाण प्रकरणी दिलेल्या निकालात आज सुप्रीम कोर्टाने जितेंद्र आव्हाड यांना फटकारलं आहे. तसेच सुप्रीम कोर्टाने दिलेल्या आजच्या निकालात या प्रकरणाचा पुन्हा तपास करण्याची मागणी मान्य केली आहे. तसेच तीन महिन्यात तपास संपवावा आणि चार्जशीट दाखल करावी असे निर्देष सुप्रीम कोर्टाने दिल्याचे करमुसे यांनी सांगितले.
मुंबई: इंडियन प्रीमियर लीग २०२५च्या ४३व्या सामन्यात आज चेन्नई सुपर किंग्स आणि सनरायजर्स हैदराबादशी होत…
मुंबई: पहलगाम येथे नुकत्याच झालेल्या दुर्घटनेनंतर जखमी व त्यांच्या कुटुंबियांसाठी मुंबई महानगरपालिकेच्या टोपीवाला नॅशनल मेडिकल…
अमित शाहांनी साधला सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद नवी दिल्ली : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी…
मुंबई: जम्मू काश्मीरमधील पहलगाम (Pahalgam Terror Attack) येथे पर्यटकांवर हल्ला होत असताना स्वतःच्या जीवाची पर्वा…
मे महिन्याच्या सुरवातीस होणार उद्घाटन मुंबई : गेल्या काही दिवसांपासून मुंबईमध्ये (Mumbai Metro) मेट्रो-३ फेज…
मुंबई : ‘संपूर्ण सखोल स्वच्छता अभियान’ अंतर्गत मुंबईतील लहानसहान रस्ते, गल्लीबोळांची स्वच्छता केल्यानंतर शासकीय, महानगरपालिका…