ठाकरेंच्या देव्हाऱ्यातील 'तो' धनुष्यबाण शिंदेंनीच गिफ्ट दिलेला!

  140

मुंबई : निवडणूक आयोगाने शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह एकनाथ शिंदे गटाला दिल्यानंतर उद्धव ठाकरेंनी पत्रकारांना खरा धनुष्यबाण आपल्याकडे असल्याचे वक्तव्य केले होते. यावेळी त्यांनी शिवसेनाप्रमुखांच्या देव्हाऱ्यातील छोट्या धनुष्यबाणाची प्रतिकृती दाखविली होती. तो खरा धनुष्यबाण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीच बाळासाहेबांना भेट दिला होता, अशी चर्चा आता सुरू आहे.


उद्धव ठाकरे यांनी दाखवलेला 'तो' धनुष्यबाण बाळासाहेबांना तुम्ही गिफ्ट दिला होता का? असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता शिंदे यांनी हास्यमुद्रेत मी दिलेल्या गोष्टी कधी काढत नाही आणि त्यावर बोलणार नाही, अशी प्रतिक्रिया दिली.


धनुष्यबाण आणि शिवसेना नावाचे आम्ही स्वागत केलेले आहे. निवडणूक आयोगाचा निकाल कायम आहे. खरी शिवसेना आमच्याकडेच आहे, असे शिंदे म्हणाले. आमच्या बाजूने निर्णय आल्याने उद्धव ठाकरे आणि विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे. आम्ही जे धडाकेबाज निर्णय घेतोय त्यामुळे ते घाबरलेले आहेत आणि बिथरलेले आहेत. त्यामुळे आमच्यावर आरोप करत आहेत, पण आम्ही कामाने उत्तर देऊ, असेही ते म्हणाले.


एमपीएससीच्या प्रश्नावर निवडणूक आयोग हे माझ्याकडून अनावधानाने झाले आहे. नेहमी निवडणूक आयोग, कोर्ट अशा गोष्टी चालू असल्यामुळे तसे झाले, असे शिंदे म्हणाले.

Comments
Add Comment

रवींद्र चव्हाण नवे भाजपा प्रदेशाध्यक्ष, बिनविरोध निवड

भाजपाची कोकणातील ताकद आणखी वाढणार मुंबई : भाजप प्रदेश कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची प्रदेशाध्यक्षपदी

RailOne ॲप लाँच, आता सर्व सुविधा एकाच जागी मिळणार, तिकीट बुकिंगपासून ते लाईव्ह ट्रेन ट्रॅकिंग

मुंबई : रेल्वेने प्रवास करणाऱ्यांसाठी आता आनंदाची माहिती आहे. रेल्वे प्रवाशांच्या सोयीसाठी रेल्वेने एक नवीन

ज्या कंपन्यांमुळे पिण्याचे पाणी प्रदूषित होत असेल त्यांच्यावर कारवाई करू

मुंबई : कोकणात रत्नागिरी जिल्ह्यातील लोटे एमआयडीसीमधून रसायन मिश्रीत पाणी नदीत सोडले जाते. यामुळे पिण्याचे पाणी

Devendra Fadanvis : "...नंतर गाशा गुंडाळून गायब होतात", CM फडणवीसांचं महाराष्ट्रातील जनतेला आवाहन

'कुणीही स्वतःच्या खिशातून पैसे देत नाही'- मुख्यमंत्री फडणवीस मुंबई : आज विधानसभेत टोरेस कंपनीच्या (Torres Company)

Maharashtra Monsoon Session 2025 : पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी विधानसभेत मोठा गदारोळ, नाना पटोलेंचे दिवसभरासाठी निलंबन, राहुल नार्वेकर भडकले अन् थेट

मुंबई : राज्य विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी विधानसभेत मोठा गदारोळ झाल्याचं पाहायला मिळतंय.

मराठी भाषेबाबत तडजोड, गळचेपी सहन करणार नाही

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मांडली शिवसेनेची भूमिका मुंबई : मराठी भाषेबाबत आपण कधीही तडजोड सहन करणार नाही,