केडीएमसीकडून अनधिकृत बांधकामांवर धडक कारवाई

कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या अनधिकृत बांधकाम विरोधी विभागातर्फे कल्याण पश्चिम वाडेघर येथील श्रमिक सोसायटी मधील अनधिकृत कार्यालयाच्या बांधकामावर आणि चिकणघर गल्ली नं. ४ येथील अनधिकृत गाळ्याच्या बांधकामावर निष्कासनाची कारवाई करण्यात आली. ही कारवाई आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे यांच्या निर्देशानुसार व उपायुक्त सुधाकर जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली 'ब' प्रभागाचे सहाय्यक आयुक्त राजेश सावंत यांनी अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागाचे कर्मचारी आणि महापालिका पोलिस कर्मचारी यांच्या मदतीने केली.


तसेच ह प्रभागातही सहाय्यक आयुक्त सुहास गुप्ते यांनी डोंबिवली पश्चिम कोपर क्रॉस रोड, जैन मंदिर शेजारी बांधकामधारक ब्रिजेश सिंग व सोमनाथ भोईर यांच्या ७ मजली अनधिकृत इमारतीच्या स्लॅब बांधकामावर निष्कासनाची धडक कारवाई केली. हि कारवाई अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागाचे अधिक्षक अरुण पाटील व इतर कर्मचारी, महापालिका पोलिस कर्मचारी, विष्णुनगर पोलिस स्टेशनचे कर्मचारी यांच्या मदतीने आणि ४ काँक्रीट ब्रेकर व २० मजूर यांच्या सहाय्याने करण्यात आली.

Comments
Add Comment

पुण्याच्या इंदिरा युनिव्हर्सिटीच्या संचालकांनी मानले उपमुख्यमंत्री शिंदेंचे आभार

मुंबई: “आजवर तुमच्याबद्दल फक्त ऐकून होते, मात्र तुम्ही प्रत्यक्षात संकटाच्या वेळी मदतीला धावून येता, याची

करारी पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत पूजा सावंत

मुंबई : मराठी चित्रपटसृष्टीत आघाडीच्या नायिकेला पोलिसांच्या वर्दीत पाहणं हे तसं दुर्मिळच. मात्र आगामी

आशिष शेलार यांनी केली ‘पीएम व्हिजन टू आर्ट’ स्पर्धेच्या विजेत्यांच्या नावाची घोषणा

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त गेल्या वर्षी संपूर्ण भारत देशात ‘पीएम व्हिजन टू

भारतीय सिनेमाचा अभिमान ‘बूंग’ ६ मार्चला पुन्हा रिलीज, ट्रेलर झाला प्रदर्शित

एक्सेल एंटरटेनमेंट, चॉकबोर्ड एंटरटेनमेंट आणि सूटेबल पिक्चर्स यांची BAFTA जिंकणारी पहिली भारतीय फिल्म ‘बूंग’ ६

माजी खासदाराचे निधन, मुख्यमंत्र्यांनी पाठवला शोकसंदेश

लातूर : लातूर पॅटर्नचे शिल्पकार, माजी खासदार, माजी कुलगुरू आणि प्रख्यात विचारवंत डॉ. जनार्दन वाघमारे यांचे

Chandra Grahan 2026: चंद्रग्रहणात धुळवड खेळावी? काय करावे, टाळावे? जाणून घ्या

मुंबई: यंदा होळी आणि चंद्रग्रहण अशी दुर्मीळ घटना जुळून आली आहे. २ मार्च रोजी होलिका दहन असून ३ मार्चला