५० वर्षांपुढील कैद्यांना तुरुंगात मिळणार बेड आणि उशी

मुंबई: राज्यातील तुरुंगात शिक्षा भोगत असलेल्या ५० वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या कैद्यांना यापुढे बेड आणि उशी मिळणार आहे. आत्तापर्यंत तुरुंगात कैद्यांना झोपण्यासाठी ताडपत्री किंवा चादर मिळत होती. मात्र, अतिरिक्त महासंचालक (तुरुंग) अमिताभ गुप्ता यांनी वर्षानुवर्षे सुरू असलेल्या या कैदी परंपरेत बदल केला आहे.


अमिताभ गुप्ता यांनी मंगळवारी यासंदर्भात माहिती दिली. मात्र, ज्या कैद्यांना ही सुविधा हवी आहे, त्यांना हे स्वखर्चाने आणावे लागेल, असेही त्यांनी स्पष्ट केले. गुप्ता यांनी याबाबत तुरुंग विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत घेतलेल्या बैठकीत काही कैदी हे विविध आजाराने ग्रस्त असल्याची माहिती दिली. या कैद्यांची आजारपणामुळे रात्री नीट झोप होत नाही. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचे गुप्ता यांनी सांगितले. त्यासाठीची साईजही निश्चित करण्यात आली असल्याही माहिती त्यांनी दिली.


महाराष्ट्रात सध्या ५० वर्षे वयापेक्षा अधिक असलेल्या कैद्यांची संख्या जवळपास साडे तीन ते ४ हजार एवढी आहे. या ज्येष्ठ कैद्यांव्यतिरिक्त जर तुरुंगात एखादा कैदी अनेक दिवसांपासून आजारी असेल आणि तुरुंगातील डॉक्टरांनी तसे प्रमाणित केल्यास आणि शिफारस केल्यास संबंधित कैद्यांनाही बेड आणि उशीचा वापर करण्यास परवानगी दिली जाईल.

Comments
Add Comment

'जिजामाता नगरवासियांच्या पुनर्वसनाचा विषय नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात मांडणार'

मुंबई :  मागील तीस वर्षांपासून काळाचौकी येथील जिजामाता नगरवासियांचे पुनर्वसन विकासकाच्या आडमुठेपणाच्या

चेंबूरमध्ये शिक्षणासाठी पाच किलोमीटर पायपीट

मराठी शाळेअभावी विद्यार्थ्यांचे हाल मुंबई : चेंबूर येथील वाशीनाका परिसरात पालिकेच्या मराठी माध्यमाची

मुंबईतील अनधिकृत झोपड्यांवर ‘नेत्रम’ची नजर

बांधकामाचे फोटो, बांधकाम करणाऱ्या व्यक्तीचे नाव अॅपवर समजणार मुंबई : मुंबईतील अनधिकृत झोपड्यांच्या समस्येवर

राज्यातील शेतकऱ्यांना ३० जूनपर्यंत कर्जमाफी!

परदेशी कमिटीचा अंतिम अहवाल एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात जमा होणार मुंबई : कर्जमाफीबाबत राज्यातील

माहिम मोरी रोड शाळेच्या पुनर्विकासाच्या भूमिपुजनाचा लवकरच वाढणार नारळ

तब्बल सात वर्षांपासून बंद करण्यात आली शाळा, दोन वर्षांपासून आहे जमिनदोस्त मुंबई (विशेष प्रतिनिधी): माहिममधील

वांद्रे तलाव बनले बकाल, तलावात शेवाळयुक्त दुर्गंधी पाणी आणि कचरा

तलावाभोवतीचे सुरक्षा कठडे तुटलेले जॉगिंग ट्रॅकवरील लाद्या उखडलेल्या मुंबई (सचिन धानजी): मुंबई महानगरपालिकेने