आलिया भटच्या मनाविरुद्ध कोणी काढले फोटो?

  136

मुंबई: बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट सध्या चांगलीच संतापली आहे. कारणही तसेच आहे, काही पापराझींनी आलियाच्या घरासमोरील गच्चीवरुन लिविंग रुमचे फोटो काढले आहेत. तसेच हे फोटो सोशल मीडियावर व्हायरलही झाले आहेत. त्यानंतर आलियाने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत तिचा संताप व्यक्त केला आहे. या पोस्टमध्ये तिने मुंबई पोलिसांना टॅग केलं आहे. आता पोलिसांनी आलियाशी संपर्क साधला असून तिला तक्रार दाखल करण्यास सांगितले आहे.



आलियाची पोस्ट काय आहे?


आलियाने संताप व्यक्त करत लिहिलं आहे, “मी घरातील लिव्हिंग रुममध्ये बसले होते. त्यावेळी कोणीतरी मला पाहतयं असं मला जाणवलं. मी खिडकीत येऊन पाहिल्यानंतर मला कळलं की, समोरच्या इमारतीच्या गच्चीवरुन फोटाग्राफर माझे फोटो काढत आहेत. एखाद्याच्या खासगी आयुष्यात डोकावणं किती योग्य आहे? प्रायव्हसीच्या सर्व मर्यादा ओलांडल्या गेल्या आहेत.
मुंबई पोलिसांच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, ‘खार पोलिसांनी आलिया भट्टशी संपर्क साधला आहे. तसेच तिला सांगितलं आहे की, फोटोग्राफरविरोधात तक्रार दाखल करावी. पोलीस या प्रकरणाची चौकशी करतील.


आलियाच्या पोस्टवर सेलिब्रिटींसह चाहते देखील आपली प्रतिक्रिया देत संताप व्यक्त करत आहेत. आलियाची पीआर टीम आता फोटोग्राफरच्या शोधात आहे. आलियाची आई सोनी राजदान यांनी म्हटलं की, “लवकरच पोलिसांनी त्या फोटोग्राफरवर कारवाई करावी”. अर्जुन कपूरने लिहिलं आहे की, "हे खूप लज्जास्पद आहे. सामान्य असो किंवा सेलिब्रिटी महिला आज त्या त्यांच्याच घरात सुरक्षित नाहीत, ही गंभीर बाब आहे".

Comments
Add Comment

हार्बर रेल्वे ठप्प! तांत्रिक बिघाडामुळे नेरूळ ते पनवेल सेवा बंद, संध्याकाळी घरी जाणाऱ्या प्रवाशांचे हाल

तांत्रिक बिघाडामुळे आज रविवारी संध्याकाळच्या सुमारास हार्बर रेल्वे सेवा विस्कळीत नवी मुंबई: मुंबईतील मध्य

दादरचा ऐतिहासिक कबूतरखाना बंद: मुंबईची एक ओळख काळाच्या पडद्याआड

मुंबई: दादर पश्चिमेचा कबुतरखाना आता कायमचा बंद होणार आहे. एकेकाळी दादरकरांसाठी पत्ता सांगताना कबुतरखाना ही एक

सर्व प्रतिज्ञापत्रांसाठी मुद्रांक शुल्क माफ

महसूलमंत्री बावनकुळे यांची घोषणा मुंबई : सर्व प्रकारच्या प्रतिज्ञापत्रासाठी जोडावे लागणारे पाचशे रुपयांचे

पालकमंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत नागरिकांच्या सार्वजनिक, वैयक्तिक समस्यांवर थेट सुनावणी

जनतेच्या तक्रारींचे त्वरित निवारण  सिंधुदुर्गनगरी : शनिवारी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नागरिकांच्या अनेक

आपल्या देशाचे नाव उंचावण्याची भावी अधिकाऱ्यांची जबाबदारी

खासदार नारायण राणे यांचे यूपीएससी गुणवंतांना मार्गदर्शन मुंबई : येत्या काळात भारत हा चौथ्या अर्थव्यवस्थेवरून

शुक्रवारच्या कारवाईनंतर दादर कबुतर खान्यावर खाद्य देणे सुरूच !

खाद्य विकणाऱ्यांसह दाणे टाकणाऱ्यांवर कारवाई करण्याकडे दुर्लक्ष मुंबई (प्रतिनिधी) : मुंबईतील कबुतर खान्यांवर