लंडन (वृत्तसंस्था) : जगप्रसिद्ध इंग्लिश फुटबॉल क्लब मँचेस्टर युनायटेडला विकत घेण्यासाठी चढाओढ सुरू आहे. जगभरातील धनाढ्यांनी अंतिम मुदतीनुसार क्लब खरेदी करण्यासाठी बोली सादर केल्या आहेत. इस्लामिक बँक ऑफ कतारचे अध्यक्ष शेख जसिम बिन हमाद अल थानी यांनी सुमारे ४४ हजार कोटी रुपयांची बोली लावल्याचे समजते.
रॅटक्लिफने क्लब विकत घेण्यासाठी ४० हजार कोटींची बोली लावली आहे. ते युनायटेडचे बहुतेक स्टॉक खरेदी करतील. असे मानले जात आहे की त्यांच्यासोबत युनायटेडच्या निर्णयप्रक्रियेत ग्लेझर कुटुंबाचाही सहभाग असेल. अमेरिकेची हेज फंड कंपनी इलियट इन्व्हेस्टमेंट मॅनेजमेंटलाही युनायटेड विकत घ्यायचे आहे आणि त्यांनी बोलीही लावली आहे.