संजय राऊत यांच्याविरोधात नाशिक, ठाण्यात गुन्हा दाखल

नाशिक/ठाणे : खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर आक्षेपार्ह भाषेत टीका केली होती. याप्रकरणी शिंदे गटाचे नेते योगेश बेलदार यांच्या तक्रारीवरून नाशिकच्या पंचवटी पोलिस ठाण्यात संजय राऊत यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर आता ठाण्यातही राऊत यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.


निवडणुक आयोगाने शिवसेना हे नाव आणि चिन्ह एकनाथ शिंदे यांना दिले आहे. निवडणुक आयोगाच्या या निर्णयानंतर ठाकरे गटातून मोठ्या प्रमाणावर टीका करण्यात येत आहे. संजय राऊत यांनी याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर खालच्या पातळीवर जाऊन टीका केली होती. आता हेच प्रकरण त्यांच्या अंगलट येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.


संजय राऊत यांच्या विरोधात ठाण्यात शिवसेना महिला आघाडी आक्रमक झाली आहे. त्यांच्या विरोधात काल संध्याकाळी आंदोलन करण्यात आले. त्यानंतर आज ठाण्यातील नगर पोलिस ठाण्यात संजय राऊत यांच्या विरोधात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी अदखलपात्र गुन्हा नोंदवण्यात आला आहे.


केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे पुण्यात असताना उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली होती. अमित शहा म्हणाले, मुख्यमंत्रीपदाच्या लालसेपोटी उद्धव ठाकरे हे काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे तळवे चाटायला गेले. पण निवडणूक आयोगाने दूध का दूध, पानी का पानी केले.


याच वक्तव्यावरुन वादाला सुरुवात झाल्याचे पाहायला मिळाले. अमित शहा यांना प्रत्युत्तर देताना संजय राऊत यांची देखील जीभ घसरल्याचे पाहायला मिळाले. संजय राऊत म्हणाले, आता हे लोक काय चाटत आहेत. ही चाटूगिरी महाराष्ट्रात कधीच झाली नव्हती. अशाप्रकारची टीका संजय राऊत यांनी केली होती. आता हेच वक्तव्य त्यांच्या अंगलट आले आहे.

Comments
Add Comment

तुम्ही लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असाल तर ही हे आधी वाचा...नाहीतर मिळणार नाहीत पैसे

मुंबई: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या सर्व महिलांसाठी एक महत्त्वाची सूचना आहे. या योजनेतील

ब्रँड विरुद्ध ब्रँडी: फडणवीस-ठाकरे गटात शाब्दिक युद्ध, राजकारण तापले!

मुंबई: बेस्ट (BEST) निवडणुकीनंतर महाराष्ट्राच्या राजकारणात 'ब्रँड' विरुद्ध 'ब्रँडी' असा नवा वाद सुरू झाला आहे.

मराठा आरक्षण मार्गातील सर्वात मोठा अडथळा दूर

हैदराबाद गॅझेट ‘जीआर’ विरोधातील याचिका हायकोर्टाने फेटाळली मुंबई : हैदराबाद गॅझेटियरच्या अंमलबजावणीला

पवारांच्या आमदाराने जरांगेंकडून पुन्हा आंदोलन करवले- छगन भुजबळ

नागपूर : अंतरवली सराटी येथे 2 सप्टेंबर 2023 रोजी झालेल्या लाठीचार्जनंतर मनोज जरांगे यांचे आंदोलन पुन्हा सुरू

IND vs PAK : हस्तांदोलन वादाचा खरा आरोपी सापडला!

मुंबई : भारत आणि पाकिस्तान (IND vs PAK) यांच्यात झालेल्या सामन्यात दोन्ही संघांच्या खेळाडूंनी हस्तांदोलन करण्यास नकार

आता बोला? एकाच घरात ४,२७१ मतदार!

नवी दिल्ली : उत्तर प्रदेशातील महोबा जिल्ह्यात त्रिस्तरीय पंचायत निवडणुकीच्या मतदार यादीत मोठी अनियमितता समोर