कोल्हापूर : भाजपसोबत युतीत राहून आमची पंचवीस वर्षे सडली, असं म्हणाऱ्यांचे दोन्ही काँग्रेससोबत गेल्यावर अस्तित्व संपले आहे. आता त्यांना पुन्हा राजकारणात उठता येणार नाही असा सणसणीत टोला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लगावला. कोल्हापुरातील भाजपच्या विजयी संकल्प मेळाव्यात ते बोलत होते. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, मंत्री चंद्रकांत पाटील, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे व्यासपीठावर उपस्थित होते.
फडणवीस म्हणाले, कोल्हापूरात एकदा रणशिंग फुंकले की त्याचा वणवा महाराष्ट्रात पेटतो. म्हणूनच भाजपच्या विजयी मेळाव्याची सुरुवात कोल्हापूरातून केली जात आहे. गेल्या निवडणूकीत प्रचाराचा प्रारंभ ही आम्ही कोल्हापूरातून केला आणि त्यानंतर आम्हाला ४१ जागा मिळाल्या. तेच लक्ष्य घेवून आम्ही आगामी लोकसभेच्या निवडणुकीत उतरणार आहोत, असे फडणवीस म्हणाले.
लोकसभेला चांगले यश मिळाले परंतू विधानसभेला जरा गडबडी झाल्या त्यामुळे पुरेसे यश मिळाले नाही. त्याची दुरुस्ती या निवडणुकीत करायची आहे. आमदारांनी खासदारांना निवडून आणायचे आहे आणि खासदारांनी आमदाराना विजयी करायचे आहे, हे ध्येय लक्षात घेवून मैदानात उतरायचे आहे. निकालानंतर पुन्हा विजयी मेळावा आम्ही याच कोल्हापूरात घेवू, असाही विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला.
नवी दिल्ली : भारताच्या पुरुष क्रिकेट संघाचा मुख्य प्रशिक्षक (हेड कोच) गौतम गंभीर याला आयसिस…
मुंबई: उन्हाळा आला की तो आपल्यासोबत अनेक आव्हाने घेऊन येतो. घामामुळे आणि तीव्र सूर्यप्रकाशामुळे त्वचेला…
दिवसभर तुमची त्वचा ताजी राहील मुंबई: उन्हाळ्यात आपण आपल्या त्वचेची काळजी घेतली पाहिजे. कारण आता…
नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तान यांच्या दरम्यान सागरी तसेच भू सीमा मोठी आहे. भू…
मुंबई : महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असलेल्या आणि जम्मू कश्मीर मध्ये दहशतवाद्यांच्या भ्याड हल्ल्यानंतर तिथे अडकलेल्या…
मुंबई(ज्ञानेश सावंत): राजस्थानने सलग चार सामने गमावले आहेत त्यापैकी तीन सामने अगदी थोड्या अंतराने गमावले…