नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आयपीएलच्या आगामी हंगामाचे वेळापत्रक जाहीर झाले असून ३१ मार्च ते २८ मे या कालावधीत ही स्पर्धा रंगणार आहे. गतविजेते गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यातील लढतीने १६व्या हंगामाचा पहिला सामना अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला जाणार आहे.
मुंबई इंडियन्सचा पहिला सामना २ एप्रिल रोजी आरसीबीविरुद्ध होणार आहे. दहा संघांना दोन ग्रुपमध्ये विभागण्यात आले आहे. पहिल्या ग्रुपमध्ये मुंबई, राज्यस्थान, दिल्ली आणि लखनऊ या संघांचा सहभाग आहे. ब गटात चेन्नई, पंजाब, हैदराबाद, आरसीबी आणि गुजरात हे संघ आहेत. मुंबई आणि चेन्नई या दोन्ही संघाला वेगवेगळ्या ग्रुपमध्ये ठेवण्यात आले आहे. मुंबई आणि चेन्नई यांच्यामध्ये प्रत्येकी दोन सामने होणार आहेत.
आयपीएलच्या सोशल मीडिया हँडलवरून याबाबतची अधिकृत घोषणा केली गेली. अहमदाबाद, मोहाली, लखनऊ, हैदराबाद, बंगळुरू, चेन्नई, दिल्ली, कोलकाता, जयपूर, मुंबई, गुवाहाटी आणि धर्मशाळा या ८ स्टेडियमवर हे सामने खेळवले जातील. ७० सामने साखळी फेरीतील असतील. तर १८ डबर हेडर सामने खेळवले जाणार आहेत.