Tuesday, October 28, 2025
Happy Diwali

क्रिकेटर पृथ्वी शॉवर हल्ला, गाडीच्या काचा फोडल्या

क्रिकेटर पृथ्वी शॉवर हल्ला, गाडीच्या काचा फोडल्या

मुंबई: भारतीय क्रिकेटर पृथ्वी शॉ याच्यावर हल्ला झाला. सेल्फी घेण्यास नकार दिल्याने त्याच्या दोन चाहत्यांनीच हे पाऊल उचलल्याचे समजते. शॉची कार समजून आरोपींनी मित्र आशिष यादव यांच्या कारचे बेसबॉलच्या बॅटने नुकसान केले.

शॉ १५ फेब्रुवारीला सांताक्रूझमधील एका रेस्टॉरंटमध्ये आशिषसोबत डिनरला गेला होता. त्यावेळी दोन व्यक्तींनी शॉकडे सेल्फीसाठी आग्रह केला. शॉने त्यांना सेल्फी दिले पण त्यानंतरही ते पुन्हा सेल्फीसाठी आग्रह करु लागले. त्यावेळी शॉ याने त्यांना नकार देत हॉटेल व्यवस्थापकाकडे या प्रकरणाची तक्रार केली. हॉटेलच्या मॅनेजरने त्यांना शॉला त्रास देऊ नये असे बजावत, रेस्टॉरंट सोडण्यास सांगितले.

रात्रीचे जेवण करून शॉ त्याच्या मित्रासोबत रेस्टॉरंटमधून बाहेर पडला. त्या चाहत्यांनी शॉची गाडी समजून त्याच्या मित्राच्या गाडीला ट्रॅफिक सिग्नलवर थांबवले आणि त्यानंतर बेसबॉल बॅटने गाडीच्या काचेची तोडफोड केली. तसेच याची पोलिस स्टेशनला तक्रार करु नये यासाठी शॉचा मित्र आशिष याला ५० हजार रुपयेही देऊ केले.

याप्रकरणी आशिषने ओशिवरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

Comments
Add Comment